शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

१०,००० पॅलेस्टिनींचा युद्धात बळी, गाझाचा जगाशी संपर्क तोडला; मोठ्या संहाराची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 07:54 IST

गाझात इस्रायल सैन्याने प्रवेश केल्यास त्यांच्याशी कडवी झुंज देण्याचे हमासने ठरविले आहे.

तेल अवीव : इस्रायल व हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात १० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने सोमवारी पहाटे संपूर्ण गाझा शहराला वेढा घातला. हमासचा वरचष्मा असलेल्या गाझा शहराच्या उत्तर भागाचा तेथील अन्य भागांशी संपर्क तोडण्यात आला. इस्रायली सैन्य गाझा शहरात कोणत्याही क्षणी प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे खूप मोठा संहार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

गाझात इस्रायल सैन्याने प्रवेश केल्यास त्यांच्याशी कडवी झुंज देण्याचे हमासने ठरविले आहे. त्या शहरातील लोक इस्रायली सैन्याशी लढण्याकरिता रस्त्यावर उतरणार आहेत, असे हमासने म्हटले आहे. त्यामुळे मृत व्यक्ती व जखमींच्या संख्येतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इस्रायलने कोंडी केल्यामुळे गाझामध्ये इंधन, औषधी, अन्नधान्य अशा जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तेथील शाळांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अख्यत्यारीतील संघटनांनी मदत छावण्या सुरू केल्या आहेत. (वृत्तसंस्था)

पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चापश्चिम आशियातील चिंताजनक स्थिती व इस्रायल-हमास संघर्षाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रईसी यांच्याशी सोमवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. दहशतवादी हल्ले, हिंसाचार व निरपराध व्यक्तींचे होत असलेले मृत्यू याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एका पत्रकात म्हटले आहे की, युद्धग्रस्त भागातील नागरिकांना मानवतावादी दृष्टिकोनातून जीवनावश्यक गोष्टींची मदत पुरविणे, शांतता  या गोष्टींवर मोदी व रईसी यांनी भर दिला आहे.

अमेरिकेची आण्विक पाणबुडी तैनातअमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या कमांडसाठी आण्विक पाणबुडी पाठवली आहे. ओहायो प्रकारच्या पाणबुड्या अण्वस्त्रांनी सुसज्ज आहेत. मध्यपूर्वेत, भूमध्य समुद्र, लाल समुद्र, पर्शियन गल्फ आणि ओमानच्या आखातात अमेरिकेची कमांड आहे. मात्र, अण्वस्त्र पाणबुडी कुठे तैनात करण्यात आली आहे, हे अमेरिकन लष्कराने सांगितले नाही. अमेरिकेच्या या कृतीने अरब देश संतापले आहेत.

युद्धविरामाची अमेरिकेची सूचना फेटाळलीमानवतेच्या दृष्टिकोनातून युद्धविराम घेण्याची अमेरिकेची सूचना इस्रायलने फेटाळून लावली आहे. हमासने ओलिस ठेवलेल्या २४० जणांची तत्काळ मुक्तता करावी अशी मागणीही इस्रायलने केली होती. जॉर्डन, इजिप्त यांनी वारंवार इशारे देऊनही इस्रायल गाझातील कारवाई थांबविण्यास राजी नव्हता.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धGaza Attackगाझा अटॅक