शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्याच्या बाळाचं वजन तब्बल २८ किलो. काय असेल कारण ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 17:22 IST

बाळाचं गुबगुबीत असणं तसं उत्तम आरोग्याचं लक्षण मानलं जातं. पण हे अवाढव्य वजन चिंतेचा विषय आहे.

ठळक मुद्देमुलाचं वजन जास्त असल्याने आधी आई खुश होती. मात्र नंतर तिला सत्याची जाणीव झाली.हा एक आजार असल्याचं डॉक्टर म्हणतात. यात मुलाची जास्त काळजी घ्यायला हवी.आता त्या मुलाच्या वजनावर नियंत्रण न आणल्यास भविष्यात चिंता उद्भवू शकते.

मेक्सिको - सामान्यत: १० महिन्यांच्या बाळाचं वजन किती असतं? फार फार तर ५ किलो. पण तुम्हाला कोणी सांगितलं की एका १० महिन्याच्या बाळाचं वजन तब्बल २८ किलो आहे तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना. पण हो हे खरंय. मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या एका १० महिन्याच्या चिमुकल्याचं वजन २८ किलो आहे. या चिमुकल्याला नेमका कोणता आजारा झालाय याबाबत डॉक्टर अभ्यास करत आहेत, मात्र त्याच्यावर वेळीच उपचार नाही केले तर त्याची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

सर्व फोटो - www.news.com.au

मेक्सिकोमधल्या टेकोमॅन या शहरात राहणारा लुईस मॅन्यूल्स हा चिमुकला अशा विचित्र आजाराने ग्रस्त आहे. त्याचा जन्म झाला तेव्हा तो ३.५ किलो वजनाचा होता. दुसऱ्याच महिन्यात तो १० किलोचा झाला.

सुरुवातीला आपण योग्यप्रकारे बाळाची काळजी घेतोय, स्तनपान करतोय म्हणून बाळाची सुयोग्य वाढ होतेय, असं त्याची आई इस्बेल पँटोजा हिला वाटलं. मात्र  पुढच्या ८ महिन्यात त्याचं वजन तब्बल १८ किलोंनी वाढून २८ किलो झाल्याने त्यांची चिंता बळावली. त्यांनी यावर उपचार सुरू केले आहेत.

या चिमुकल्याचं वजन गरजेपेक्षा जास्त असल्याने तो व्यवस्थित हालचालही करू शकत नाही. मात्र नक्की कोणत्या कारणाने बाळाचं वजन वाढतंय यावर डॉक्टरांना उत्तर मिळू शकलेलं नाही. त्याच्यावर योग्य उपचार करण्याची गरज असून तो इतर सदृढ बाळाप्रमाणे होण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागणार आहे.

या चिमुकल्याचे आई-वडिल फार तुटपूंज्या पगारात घर चालवत असल्याने या चिमुकल्याच्या खर्चासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाहीए. यावर तोडगा म्हणून त्यांनी एक फेसबुक पेज तयार केलं असून त्याद्वारे त्यांनी मदतीची हाक दिली आहे. 

 गरदोरपणात चिमुकल्याच्या आईने योग्य आहार घेतला नसल्याने मुलाचं अवाढव्य वजन वाढत जात असल्याचा निष्कर्ष काही डॉक्टरांनी लावला आहे. आईने तिच्या गरदोरपणात योग्य आहार न घेतल्यास बाळाला प्रेडर विली सिंड्रोम हा आजार होऊ शकतो.

या आजारात बाळांच वजन वाढण्याची शक्यता असते. मात्र नक्की याच आजारामुळे बाळाचं वजन वाढतंय यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र आहारतज्ज्ञ सिल्विया ओरझ्को यांनी सांगितलं आहे की, वेगाने वाढणाऱ्या वजनामुळे या बाळाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे याच्यावर वेळीच उपचार होणे गरजेचं आहे.

सौजन्य - www.asianage.com

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयscienceविज्ञान