वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये व्हिसा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी करण्यात आलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये १० भारतीय अमेरिकींसह २१ जण अडकले. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या स्टिंग आॅपरेशनमध्ये अमेरिकन प्रशासनानेच बोगस विद्यापीठ स्थापन करून त्याद्वारे एक हजाराहून अधिक परदेशींना विद्यार्थी आणि रोजगार व्हिसा देऊ केला होता. परदेशींना बेकायदा व्हिसा मिळवून देणारे दलाल आणि भरती करणाऱ्यांनी २६ देशांतील एक हजार परदेशी नागरिकांना या बोगस विद्यापीठात प्रवेश मिळवून देऊन त्यांच्यासाठी विद्यार्थी व्हिसा आणि परदेशी कामगार व्हिसा मिळविला. त्यानंतर या सर्वांना अटक करण्यात आली. (वृत्तसंस्था)
व्हिसा घोटाळ्याच्या स्टिंगमध्ये अडकले १० भारतीय
By admin | Updated: April 6, 2016 22:13 IST