शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १० लाख मुलांचा होणार मृत्यू?; जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 05:41 IST

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार आल्यापासून तेथे विविध संकटे आली असून त्यात सर्वात मोठे संकट हे भूकबळीचे आहे. हे संकट आणखी भीषण पातळी गाठण्याची भीती आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार आल्यापासून तेथे विविध संकटे आली असून त्यात सर्वात मोठे संकट हे भूकबळीचे आहे. हे संकट आणखी भीषण पातळी गाठण्याची भीती आहे. विविध देशांनी तेथील नागरिकांना मदत न केल्यास अफगाणमध्ये मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. भीषण दुष्काळाचा सामना करत असलेल्या या देशात यंदाच्या वर्षाच्या अखेरपर्यंत १० लाख मुलांचा भूकबळी जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.नेमके काय आहे संकट?जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अफगाणमध्ये यावर्षीच्या अखेरपर्यंत भीषण अन्नटंचाई निर्माण होऊ शकते.या टंचाईमुळे ३२ लाख मुले कुपोषणग्रस्त होतील. त्यातील दहा लाख मुले दगावण्याची भीती आहे.का घटतोय हा अनर्थ?तालिबानींनी १५ ऑगस्ट रोजी अफगाणवर कब्जा मिळवला. राजधानी काबूल त्यांनी ताब्यात घेतले व आपले सरकार स्थापन केले.या तालिबानी सरकारला अनेक देशांनी मान्यताच दिलेली नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळणेही बंद झाले आहे.अमेरिका व युरोपीय देश आतापर्यंत अफगाणला अर्थसहाय्य करत होते. पण त्यांनी ती मदत बंद केली आहे.पैसाच नसल्याने अफगाण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. त्यामुळे टंचाई आणखी वाढणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.२४ हजार मुलांना एकच आजारअफगाणमधील २४ हजार मुलांना मीझल्स नावाचा आजार झाला आहे. तो आणखी वाढेल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या काबूलमधील प्रवक्ता मार्गारेट हॅरिस यांनी व्यक्त केली आहे.अर्थव्यवस्थाच डबघाईस आल्याने तेथील अनेक कर्मचारी अनेक महिन्यांपासून पगारापासून वंचित आहे. त्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्थाही कोलमडली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना