शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

CoronaVirus: कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थांसाठी झटतोय तळेरेचा 'सुपूत्र'; स्वतःच्या खिशातून भरतोय फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 19:17 IST

Inspiration Story in Corona pandemic: तळेरेच्या विशाल कडणे यांच्या अभिमानास्पद कृतीचे सर्वांकडून कौतुक; अनाथ झालेल्या पाल्यांसाठी विशाल ठरतोय देवदूत

निकेत पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्कतळेरे : आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने सन्मानित झालेला मुळ तळेरे येथील व सध्या भांडुप येथे असलेला तरुण सिव्हिल इंजिनियर गेले दीड वर्षे सातत्याने कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सेवा करत आहे. मोफत ऑक्सिमीटर, अनेक कुटुंबियांना मोफत अन्नधान्य वाटप, मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटर सेवा यासारखे अनेक सेवादायी उपक्रम विशाल कडणे (Vishal Kadane) यांनी स्वतःच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे मोडून राबवले. आता पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना भांडुप येथील समाज सेवक विशाल कडणे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मिस टूरीसम युनिव्हर्स 2021 श्रिया परब (Shriya Parab) यांच्या हस्ते करण्यात आली. 

कोव्हीडमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या कमावत्या पालकांनी प्राण गमावले त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. अशा अनेक कुटुंबीयांनी विशाल कडणे यांना संपर्क साधून त्यांच्या पाल्यांच्या फीचा आर्थिक प्रश्न मांडला. या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन विशाल कडणे आणि त्यांचे सहकारी आज अनेक विद्यार्थ्यांची फी स्वतः पुढाकार घेऊन भरत आहेत. पालक गमावलेला एक ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ह्या ध्येयाने झपाटलेल्या विशाल कडणे आणि टीमने भांडुप येथे मिस टुरिसम युनिव्हर्स 2021 विजेती श्रिया परब हिच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्यांच्या चालू टर्मच्या फी रकमेचे चेक अदा केले.  

आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांची फी अदा केली असून हा मदतीचा रथ अविरत सुरु राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेचं पुढाकार घ्यावा असे आवाहन विशाल कडणे यांनी केले आहे. त्यांच्या संस्थेच्यावतीने 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. चेंबूर-मानखुर्द ते मुलुंड येथील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश आहे. कोरोनामुळे ज्यांनी आपला कमावता पालकाचा छत्र गमावला आहे अशांसाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला आम्ही पन्नास विद्यार्थ्यांची निवड केली आहे असे विशाल कडणे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी आनंद जगन्नाथ पेडणेकर, विजय कडणे, गौरव पोतदार, डॉ प्रमोद जाधव, सुखदा कडणे, विजय कडणे, शिरीष देवरुखकर, वैभव भुर्के इत्यादी मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या