शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
2
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
4
कोहली बनला लिमिटेड ओव्हर्सचा 'किंग', सचिन तेंडुलकरचा १८,४३६ धावांचा विक्रम मोडला!
5
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
6
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
7
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
8
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
9
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
10
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
11
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
12
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
13
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
14
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
15
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
16
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
17
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
18
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
19
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
20
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत

चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:49 IST

एकामागोमाग संकटे आली. सर्वसामान्य कुटुंब असताना आलेले प्रत्येक संकट मोठ्या डोंगराएवढे होते.

संगमनेर -'संघर्षानंतर मिळणारे यश अधिक मौल्यवान आणि आनंददायक असते.' असे सांगताना संगमनेर शहरातील चहाविक्रेते दीपक साळुंके भावुक झाले होते, त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. त्याला कारणही तसेच आहे. त्यांचा मुलगा प्रज्वल याने व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी (एमबीए) संपादन केली, त्याची आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये १५ लाख रुपये इतक्या भरघोस वार्षिक पॅकेजवर सेंट किटस अॅण्ड नेव्हिस या कॅरिबियन बेटावर नोकरीसाठी निवड झाली.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या एमबीए महाविद्यालयातून प्रज्वल साळुंके याने व्यवसाय व्यवस्थापनात फायनान्समधून पदव्युत्तर पदवी संपादन केली. दीपक साळुंके चहाविक्रेते असून त्यांची शहरातील नवीन नगर रस्त्याच्या कडेला छोटीशी टपरी आहे. कष्टकरी असलेल्या साळुंके कुटुंबात दीपक साळुंके यांची पुतणी चैताली संतोष साळुंके ही आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित. अतिशय संघर्षातून चैताली आणि प्रज्वल या बहीण-भावाने हे यश मिळवले. २०१४ मध्ये दीपक साळुंखे यांना ब्रेन ट्यूमर झाला होता, त्याचवर्षी त्यांच्या कन्येचे आणि वडिलांचे निधन झाले. एकामागोमाग संकटे आली. सर्वसामान्य कुटुंब असताना आलेले प्रत्येक संकट मोठ्या डोंगराएवढे होते. साळुंखे यांच्या डोक्याच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, आजारातून ते सुखरूप बाहेर पडले. दोन्ही भावांनी आणि मित्रांनी मला साथ दिल्याचेही साळुंके अभिमानाने सांगतात.

त्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू केला. प्रज्वल हा मराठी शाळेत शिक्षण घेत असताना कुटुंबांवर आलेले संकट पाहून तो अतिशय कमी वयातच मला मदत करायचा. शिक्षण पूर्ण करताना त्याने सीएकडे सहा वर्ष नोकरीही केली. परिस्थितीतून मुलगा घडला त्यातून त्याने उच्चशिक्षण घेतले, चांगली नोकरीही मिळविली आणि तो विमानाने जातो आहे, हे सांगताना चहावाल्या साळुंखे यांना आनंद झाला होता.

प्रज्वल साळुंके सांगतो..

अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकास होतो. महाविद्यालयामध्ये नियमित वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, मॉक इंटरव्ह्यू असे अनेक उपक्रम घेतले जातात. अमृत ट्रॉफीचे माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व, बिझनेस क्वीज, बिझनेस स्कील, मॅनेजमेंट या विषयावरील मार्गदर्शन आदी उपक्रम राबविले जातात. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये समन्वय, नेतृत्व, कौशल्य यांची वाढ होते, यातून मी घडलो. माझ्या यशात शिक्षकांचे, कुटुंबीयांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी