शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...अन् आईच्या डोळ्यात आनंदाश्रू; ट्रकचालकाच्या मुलाची मोहिमेत महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 05:59 IST

गेल्या सात वर्षांपासून सोहन इस्रोशी संलग्न आहे तर चयन दत्ता हे तेजपूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी आहेत.

नवी दिल्ली - चंद्रयान-३ या ऐतिहासिक प्रवासात अनेक शास्त्रज्ञ आणि कर्मचारी कित्येक महिन्यांपासून रात्रंदिवस मेहनत घेत होते. शास्त्रज्ञ सोहन यादव हे त्यापैकीच एक. अंतराळ मोहिमेचा महत्त्वाचा भाग म्हणजे ऑर्बिटर इंटिग्रेशन आणि टेस्टिंग टीम. रांचीच्या खुंटी जिल्ह्यातील तपकरा या गावातील  शास्त्रज्ञ सोहन यादव हे याच टीमचा एक भाग आहेत. सोहन मिशन गगनयानचाही भाग आहे. सोहनचे वडील घुरा यादव ट्रकचालक आहेत. तपकरासारख्या छोट्या गावात शिक्षण घेऊन सोहन शास्त्रज्ञ झाला. गेल्या सात वर्षांपासून सोहन इस्रोशी संलग्न आहे. सोहन यांची आई देवकी देवी म्हणाल्या की,  सोहन लहानपणापासूनच खूप हुशार होता. 

...अन् आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळलेआसामच्या उत्तरेकडील भागातील लखीमपूर गावातील लोकांनी ‘चंद्रयान-३’ चे प्रक्षेपण अभिमानाने पाहिले; कारण देशाच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेत त्यांच्या गावच्या मुलाचीही महत्त्वाची भूमिका होती. चयन दत्ता यांच्या पालकांनी काही मित्र आणि ग्राहकांसह उत्तर लखीमपूर येथील त्यांच्या छोट्या दुकानात मोबाइलवर प्रक्षेपण पाहिले. मुलाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि तिने फक्त हसतच प्रतिसाद दिला. चयन दत्ता हे तेजपूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. ते सध्या अंतराळ विभागाच्या यूआर राव उपग्रह केंद्रात वैज्ञानिक/अभियंता-जी आणि चंद्रयान ३ चे उपप्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत.