शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

लोकमतची ‘इन्फ्रा कॉनक्लेव्ह - २०२१’ मुंबईत; महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आज उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 8:55 AM

Lokmat Infra Conclave-2021: उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे मान्यवर राज्याच्या विकासरथाची दिशा उलगडणार आहेत.

मुंबई : समृद्धीच्या महामार्गावर निघालेला महाराष्ट्र २०२५मध्ये विकासाच्या नकाशावर कुठे असेल, त्यातील टप्पे कसे असतील, हे स्पष्ट करणारी, राज्यस्तरीय पायाभूत सुविधांचा वेध घेणारी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह-२०२१’ आज, बुधवारी मुंबईत हॉटेल ट्रायडंट येथे होत आहे. Lokmat Infra Conclave-2021 या राज्यस्तरीय परिषदेत विविध विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी राज्याच्या विकासाचा रोडमॅप उलगडणार आहेत.या परिषदेत, नागरी भागातील पायाभूत सुविधा, औद्योगिक सुविधा, त्यांचे अर्थकारण, गृहनिर्माणातील आव्हाने आणि संधी यांच्याशी निगडित विषयांवर विचारमंथन होणार आहे. 

उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे मान्यवर राज्याच्या विकासरथाची दिशा उलगडणार आहेत. त्यांच्यासोबत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी, सिडकोचे एमडी संजय

मुखर्जी, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, कल्याण-डोंबिवलीचे महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नागपूरचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत हे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विकास नकाशाची मांडणी करणार आहेत. या परिषदेच्या आयोजनात जे. कुमार, एनसीसी, एमआयडीसी, एसएमई चेंबर ऑफ इंडिया, न्यूज १८ लोकमत यांचे सहकार्य लाभले आहे. या परिषदेस प्रवेश केवळ निमंत्रितांसाठी आहे. 

आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत‘कसा असेल महाराष्ट्र - २०२५' या विषयावर पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा घेणार आहेत.

टॅग्स :LokmatलोकमतAditya Thackreyआदित्य ठाकरे