the lion king director jon favreau reveal the only real scene in film on twitter |  ‘द लायन किंग’मध्ये आहे एकमेव ‘रिअल सीन’, जाणून घ्या कोणता?
 ‘द लायन किंग’मध्ये आहे एकमेव ‘रिअल सीन’, जाणून घ्या कोणता?

ठळक मुद्दे‘द लायन किंग’ यात सिम्बा नामक एका सिंहाची कथा आहे.

द लायन किंग’ हा लाईव्ह अ‍ॅनिमेटपट सध्या बॉक्स ऑफिसवर धूम करतोय.  १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या कार्टूनपटाची रिमेक आवृत्ती आहे. बच्चे कंपनीला जाम आवडलेल्या या चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. म्हणायला हा चित्रपट एक अ‍ॅनिमेटेड आहे. पण यातील एक सीन अ‍ॅनिमेटेड नाही तर रिअल आहे.
होय, ‘द लायन किंग’च्या दिग्दर्शक jon favreau यांनी स्वत: हा खुलासा केला आहे. चित्रपटातील एका एकमेव ‘रिअल’ सीनबद्दल त्यांनी सांगितले. हा सीन कोणता तर ‘द लायन किंग’चा अगदी पहिला सीन. ज्याची सुरुवात ‘द सर्कल ऑफ लाइफ’ या गाण्याने होते.  
जॉन यांनी आपल्या पोस्टमध्ये याबद्दल सांगितले आहे. ‘द लायन किंग या चित्रपटात एकमेव रिअल शॉट आहे. यात सीजी कलाकार आणि एनिमेटर्सनी बनवलेले 1490 शॉट्स आहे. पण आफ्रिकेत घेतलेला हा फोटो या चित्रपटातील एकमेव रिअल शॉट आहे. कुणी हा शॉट ओळखू शकतो का, हे पाहण्यासाठी तो वापरण्यात आला,’ असे जॉन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हा फोटो ऐतिहासिक म्हणता येईल. कारण 1994 मध्ये आलेल्या ‘द लायन किंग’च्या एनिमेटेड व्हर्जनमध्येही तो दाखवण्यात आला होता.
‘द लायन किंग’ यात सिम्बा नामक एका सिंहाची कथा आहे. सिम्बाचे वडिल मुफासा जंगलाचे राजा आहेत. मुफासा आणि त्याचा भाऊ  स्कार या दोघांमध्ये राजगादीवरून काही मतभेद आहेत.  या मतभेदांचे पुढे हिंसाचारात  रूपांतर होते आणि राजा मुफासाची हत्या होते. लहानगा सिम्बा मात्र मरता मरता वाचतो आणि पुढे आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी व सिंहासन परत मिळवण्यासाठी आपल्या काकाला आव्हान देतो. ही पटकथा विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’ या पुस्तकावर आधारित आहे.

Web Title: the lion king director jon favreau reveal the only real scene in film on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.