शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक महिला हॉकी : भारताने विजयाची संधी गमावली; अखेरच्या क्षणी इंग्लंडने साधली बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:59 IST

अखेरच्या काही मिनिटांमध्ये बचाव फळीतील ढिसाळपणा भारताला भोवला.

लंडन : अखेरच्या काही मिनिटांमध्ये बचाव फळीतील ढिसाळपणा भारताला भोवला. ५३ व्या मिनिटाला इंग्लंडची स्ट्रायकर लिली ओसले हिने बचावफळी भेदत गोल केला आणि सामन्यात बरोबरी साधली.विश्व चषक महिला हॉकी स्पर्धेत भारताने आॅलिम्पिक चॅम्पियन इंग्लंडच्या संघाविरोधात पहिला गोल २५ व्या मिनिटालाच केला. नेहा गोयल हिने मैदानी गोल करत ही आघाडी घेतली. विश्व रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर असलेल्या भारताने इंग्लंड विरोधात आक्रमक सुरुवात केली. त्याचा फायदादेखील भारताला मिळाला.तिसऱ्या क्वार्टरपर्यंत ही आघाडी कायम होती. मात्र अखेरच्या क्वार्टरमध्ये इंग्लंडच्या संघाने सातत्याने भारताच्या गोलपोस्टवर हल्ले केले. त्याचा फायदा घेत ५३ व्या मिनिटाला लिली ओसले हिने भारताच्या बचाव फळीचा चकवत गोल केला. पहिल्या दोन सत्रात भारताने तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळ केला. मध्यंतरानंतर भारताने त्याच जोशात खेळ पुढे नेला. भारतीय खेळाडूंनी सातत्याने आक्रमण केले. इंग्लंडनेही पलटवार केला.इंग्लंडच्या आक्रमक खेळामुळे भारताची बचावफळी काहीशी भांबावली. त्याचा फायदा इंग्लंडने घेतला. टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन खेळ करताना भारतीय खेळाडूंनी पंधरा मिनिटांच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला मार्किंगचा डाव खेळला. भारताचा पुढचा सामना २६ रोजी आयर्लंडसोबत होणार आहे.नमिता टोप्पोचा १५० वा आंतरराष्ट्रीय सामनाभारताची मध्यरक्षक नमिता टोप्पो हिने देशासाठी आज १५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ओडिशाच्या या २३ वर्षांच्या खेळाडूने २०१२ मध्ये डब्लिनमध्ये चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेत वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. देशासाठी १५० वा सामना खेळल्याबद्दल हॉकी इंडियाने तिचे अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :IndiaभारतEnglandइंग्लंडHockeyहॉकी