शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

महिला विश्वचषक : भारताचे आव्हान संपुष्टात, पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 06:16 IST

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ असे संपुष्टात आले. आयर्लंडने भारतावर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे.

लंडन : महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ असे संपुष्टात आले. आयर्लंडने भारतावर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे.महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करण्यात महिला भारतीय संघाला अपयश आले आहे. महिला संघाने क्रॉस ओव्हर सामन्यात इटलीवर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र, आयर्लंडचा अडथळा पार करता आला नाही. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी सामना बरोबरीत सोडवल्याने लढतीचा निर्णय पेनल्टी शूटआऊटवर झाला. सामन्याच्या १८व्या मिनिटाला आयर्लंडकडे गोल करण्याची संधी होती. मात्र, त्यांनी ती दवडली. त्यानंतर २५ व्या मिनिटाला भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये आयर्लंडच्या संघाने भारताच्या गोलवर हल्ले केले. मात्र, बचाव फळी आणि गोलकीपर सविता यांनी यश मिळू दिले नाही. चौथा क्वार्टरही गोलरहित झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडला पहिल्या २ वेळा गोल करता आला नाही. मात्र, त्यानंतर त्यांनी सलग तीन गोल करत सामना जिंकला. भारताकडून राणी, नवज्योत आणि मोनिका यांनी पहिल्या ३ संधी दवडल्या. रिना खोखर हिला एकमेव गोल करता आला.

टॅग्स :Hockeyहॉकी