शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला हॉकी; भारतीय संघाचा यजमान दक्षिण कोरियावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:02 IST

भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेची सकारात्मक सुरुवात करताना सोमवारी दक्षिण कोरियाचा सलामीच्या लढतीत १-० ने पराभव केला. भारताच्या लालरेमसियामीने (पाचवा मिनिट) नोंदवलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. भारताच्या संरक्षक फळीने शानदार कामगिरी करीत मनोधैर्य उंचावणारा विजय नोंदवला.

सेऊल  - भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेची सकारात्मक सुरुवात करताना सोमवारी दक्षिण कोरियाचा सलामीच्या लढतीत १-० ने पराभव केला. भारताच्या लालरेमसियामीने (पाचवा मिनिट) नोंदवलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. भारताच्या संरक्षक फळीने शानदार कामगिरी करीत मनोधैर्य उंचावणारा विजय नोंदवला.भारतीय संघ सुरुवातीपासून सकारात्मक भासला. पाचव्या मिनिटाला त्याचा संघाला लाभ मिळाला. लालरेमसियामीने गोलकिपर मिजिन हानला हुलकावणी देत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला.भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलक्षेत्रात वारंवार मुसंडी मारत वर्चस्व गाजवले. त्याचसोबत बचाव अभेद्य राखला.दुसºया क्वार्टरमध्ये १८ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण मिजिन हानने यावेळी चांगला बचाव केला. तीन मिनिटांनंतर कोरियाच्या गोलकिपरने पेनल्टी कॉर्नरवर चांगला बचाव केला. २३ व्या मिनिटाला भारताने एक पेनल्टी कॉर्नर गमावला, पण पदार्पणाची लढत खेळणारी गोलकिपर स्वातीने चांगला बचाव करीत संघाची आघाडी कायम राखली. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेला कोरियन संघ बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील होता, पण भारताने बचाव अभेद्य राखत यजमान संघाला कुठली संधी दिली नाही.चौथ्या क्वार्टरमध्ये स्वातीने भारताची आघाडी कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने अखेरच्या क्वार्टरमध्ये सहा मिनिटांत दोन पेनल्टी कॉर्नर रोखलेम् तर ५० व्या मिनिटाला एक पेनल्टी स्ट्रोकही रोखला. भारताला त्यानंतर आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण द. कोरियाने भक्कम बचाव करीत भारताचे प्रयत्न हाणून पाडले.भारतीय कर्णधार राणी रामपालने आज या सामन्याच्या निमित्ताने आपले आंतरराष्ट्रीय सामन्यांचे द्विशतक पूर्ण केले तर मोनिकाची ही १०० वी लढत होती. भारतीय संघ आज, मंगळवारी मालिकेतील दुसरी लढत खेळणार आहे. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत