शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: भारतीय पुरुष हॉकी संघ आज उपांत्य लढतीत बेल्जियमविरुद्ध भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 06:40 IST

Tokyo Olympics Live Updates: पदकाच्या आशा उंचावलेला भारतीय हॉकी पुरुष संघ मंगळवारी ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या निर्धाराने विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्ध भिडेल.

टोकियो : पदकाच्या आशा उंचावलेला भारतीयहॉकी पुरुष संघ मंगळवारी ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या निर्धाराने विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्ध भिडेल. त्याचबरोबर या सामन्यात बाजी मारत गेल्या ४१ वर्षांत पहिले ऑलिम्पिक पदक पटकावण्याचे लक्ष्यही भारतीयांनी बाळगले आहे.ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष संघाच्या नावावर विश्वविक्रमी आठ सुवर्णपदकांची नोंद आहे. मात्र, १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेले सुवर्ण पदक भारताचे अखेरचे ऑलिम्पिक पदक ठरले. त्यानंतर भारतीय हॉकी संघाला एकही ऑलिम्पिक पदक पटकावता आलेले नाही. आता मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वात भारतीय हॉकीचा सुवर्ण काळ पुन्हा आणण्याचा चंग भारतीय संघाने बांधला आहे. १९७२ साली म्युनिख ऑलिम्पिकमध्ये भारताने आपला अखेरचा उपांत्य सामना खेळला होता. त्यावेळी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध भारताचा ०-२ असा पराभव झाला होता.मंगळवारी बेल्जियमला नमवल्यास भारतासाठी हे सर्वात मोठे यश ठरेल. यंदाच्या स्पर्धेत दुसऱ्याच साखळी सामन्यात भारतीयांना ऑस्ट्रेलियाविरूद्ध १-७ असा दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यानंतर फिनिक्स भरारी घेतलेल्या भारतीयांनी सलग चार सामने जिंकले.  

- बेल्जियम संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, ते विद्यमान विश्वविजेते आणि युरोपीयन चॅम्पियन असून, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानीही आहेत.तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताने गेल्या काही सामन्यांत बेल्जियमवर चांगलेच वर्चस्वही गाजवले आहे. २०१९ सालच्या बेल्जियम दौऱ्यात भारताने यजमानांविरूद्ध मालिकेतील तिन्ही सामने जिंकले होते.  - त्या दौऱ्यात भारताने बेल्जियमला २-०, ३-१ आणि ५-१ असे नमवले होते. शिवाय यंदा मार्चमध्ये भारताच्या युरोपियन दौऱ्यातही झालेल्या सामन्यात भारताने बेल्जियमला ३-२ असे नमवले होते. - बेल्जियमविरूद्धच्या गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाकडून अंतिम फेरीच्या आशा अधिक उंचावल्या आहेत.

टॅग्स :IndiaभारतHockeyहॉकीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021