शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे दक्षिण कोरियाविरुद्ध बरोबरीवर समाधान, गुरजंत सिंगने टाळला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 01:08 IST

अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय हॉकी संघाला आशिया चषक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुध्द १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

ढाका : अटीतटीच्या झालेल्या लढतीत भारतीय हॉकी संघाला आशिया चषक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियाविरुध्द १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे सामन्यात एका गोलने पिछाडीवर पडलेल्या भारताने अखेरच्या मिनिटाला गोल करुन बरोबरी साधली. गुरजंत सिंगने हा निर्णायक गोल करुन भारताचा पराभव टाळला.स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताचा दक्षिण कोरियाविरुध्द विजय मानला जात होता. परंतु, कोरियाने जबरदस्त झुंज देताना भारताला बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. सलग तीन विजयांसह खेळत असलेल्या भारतीय संघाचा उत्साह दुणावला होता. परंतु, कोरियन संघाने जबरदस्त बचाव करताना भारताला आक्रमणाची फारशी संधी दिली नाही. पहिले दोन क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर तिसºया क्वार्टरच्या शेवटच्या चार मिनिटांमध्ये जाँग जुन याने अप्रतिम गोल करत दक्षिण कोरियाला १-० अशी आघाडी मिळवूण दिली.यानंतर कोरियन खेळाडूंनी भक्कम बचाव करत भारताला प्रचंड दबावाखाली आणले. भारतीयांनी गोल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु कोरियन बचाव भेदण्यात त्यांन सातत्याने अपयश आले. अखेरपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्याने कोरिया अनपेक्षित निकाल नोंदवणार हे जवळपास निश्चित झाले होते. परंतु, अखेरच्या काही मिनिटांंमध्ये भारताने साहसी चाल खेळताना गोलरक्षक हटवून सर्व खेळाडूंनिशी कोरियावर हल्ला केला आणि केवळ एक मिनिट शिल्लक असताना गुरजंत सिंगने निर्णायक गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

शेवटच्या मिनिटात निर्णायक गोल कोरियन खेळाडूंनी भक्कम बचाव करीत भारताला प्रचंड दबावाखाली आणले. भारतीयांनी गोल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांचा बचाव भेदण्यात त्यांना सातत्याने अपयश आले.अखेरपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्याने कोरिया अनपेक्षित निकाल नोंदवणार, हे जवळपास निश्चित झाले होते.परंतु, अखेरच्या काही मिनिटांंमध्ये भारताने साहसी चाल खेळताना गोलरक्षक हटवून सर्व खेळाडूंनिशी कोरियावर हल्ला केलाआणि केवळ एक मिनिट शिल्लक असताना गुरजंत सिंगने निर्णायक गोल करीत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

टॅग्स :Hockeyहॉकी