शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हॉकी संघांचे स्थान सुधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 04:23 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी जाहीर झालेल्या एफआयएच मानांकनामध्ये एका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले.

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी जाहीर झालेल्या एफआयएच मानांकनामध्ये एका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले. महिला संघानेही एका स्थानाने सुधारणा करत नववे स्थान गाठले आहे.भारतीय पुरुष संघाला गेल्या महिन्यात नेदरलँडमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत निर्धारित वेळेत १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर शूटआऊटमध्ये भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.अव्वल १० मध्ये समावेश असलेल्या संघांमध्ये केवळ भारतीय संघच आपल्या मानांकनामध्ये सुधारणा करण्यात यशस्वी ठरला. भारताच्या खात्यावर आता १४८४ गुण आहेत. २०१२ चा आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनी, इंग्लंड व स्पेन या संघांच्या तुलनेत भारताचे मानांकन गुण अधिक आहेत.विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया १९०६ मानांकन गुणांसह अव्वल स्थानी आहे. आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना (१८८३) दुसऱ्या, बेल्जियम (१७०९) तिसºया आणि नेदरलँड (१६५४) भारताच्या तुलनेत वरच्या स्थानी आहेत. अव्वल १० मध्ये जर्मनी, इंग्लंड, स्पेन, न्यूझीलंड आणि आयर्लंड या संघांचाही समावेश आहे.भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेत जेतेपद राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. मलेशिया १२ व्या स्थानासह आशियातील दुसरा सर्वोत्तम संघ आहे. त्यानंतर पाकिस्तान व कोरिया या संघांचा क्रमांकलागतो. (वृत्तसंस्था)लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाºया भारतीय महिला संघाने एका स्थानाची प्रगती करत नववे स्थान पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडविरुद्ध पराभूत झालेला भारत स्पर्धेपूर्वी दहाव्या स्थानी होता. आता ११३८ मानांकन गुणांसह नवव्या स्थानी आहे. विश्वकप विजेता नेदरलँड अव्वल स्थानी कायम असून इंग्लंड दुसºया स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाने दोन स्थानांनी प्रगती करत तिसरे स्थान पटकावले. अर्जेंटिनाची एका स्थानाने घसरण झाली असून हा संघ चौथ्या स्थानी आहे.

टॅग्स :Hockeyहॉकी