शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पदक पटकावण्यास भारतीय उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 06:44 IST

भुवनेश्वर : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय हॉकी संघ कलिंगा स्टेडियममध्ये मायदेशातील प्रेक्षकांपुढे बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी उतरेल त्यावेळी त्यांचा निर्धार ...

भुवनेश्वर : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय हॉकी संघ कलिंगा स्टेडियममध्ये मायदेशातील प्रेक्षकांपुढे बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी उतरेल त्यावेळी त्यांचा निर्धार विश्वचषक स्पर्धेमध्ये ४३ वर्षांपासून पदक न मिळाल्याचे शल्य विसरण्याचा राहील.

आठवेळा आॅलिम्पिक चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाने १९७५ मध्ये एकमेव विश्वविजेतेपद पटकावले होते. त्यावेळी अजितपाल सिंग आणि त्याच्या संघाने इतिहास घडवला होता. ‘क’ गटातील लढतीत यजमान भारत बुधवारी आपल्या माहिमेची सुरुवात करेल.१९७५ नंतर आशियातील दिग्गज भारतीय संघाला नेदरलँड, जर्मनी आणि आॅस्ट्रेलिया या संघाची बरोबरी साधण्यात अपयश आले. गेल्या चार दशकांत युरोपियन संघांनी विश्व हॉकीवर वर्चस्व कायम राखले आहे.

भारताने १९७५ नंतर सर्वोत्तम कामगिरी मुंबईमध्ये १९९२ मध्ये झालेल्या विश्वकप स्पर्धेत केली होती. त्यावेळी भारतीय संघ पाचव्या स्थानी होती. गेल्या ४३ वर्षांत भारतीय संघाला विश्वकप स्पर्धेत पदक पटकावता आलेले नाही. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेला भारतीय संघ यावेळी पदक पटकावत ती उणीव भरून काढण्यास उत्सुक आहे. भारतासाठी मात्र हे सोपे नाही. कारण त्यांना दोनवेळचा गतचॅम्पियन आॅस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी आणि आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना यांच्यासारख्या दिग्गज संघाचे आव्हान राहणार आहे. याव्यतिरिक्त यजमान संघावर अपेक्षांचे दडपणही राहणार आहे.

दोन वर्षांपूर्वी लखनौमध्ये ज्युनिअर संघाला विश्वविजेतेपद पटकावून देणारे प्रशिक्षक हरेंद्र यांना आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक कायम राखता आले नाही. त्यांच्यासाठी स्पर्धेत करा अथवा मरा अशी स्थिती आहे. संघाने चांगली कामगिरी केली नाही तर त्यांचे प्रशिक्षकपद जाण्याची शक्यता आहे.क गटात भारतापुढे बेल्जियम, कॅनडा यांचे आव्हानहरेंद्र यांनी विश्वकप विजेता ज्युनिअर संघातील सात खेळाडूंना सध्याच्या संघात संधी दिली आहे. त्याचसोबत कर्णधार मनप्रीत सिंग, पी.आर.श्रीजेश, आकाशदीप सिंग आणि बीरेंद्र लाकडा हेसुद्धा संघात आहेत. ड्रॅगफ्लिकर रुपिंदर पाल सिंगला संघातून वगळण्यात आले आहे तर स्टायकर एस.व्ही. सुनील फिटनेसच्या कारणास्तव संघाबाहेर आहे. १६ देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका, बेल्जियम आणि कॅनडा यांचा ‘क’गटात समावेश आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमविरुद्ध भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल. दक्षिण आफ्रिका संघ मानांकनात १५ व्या तर कॅनडा ११ व्या स्थानी आहे.

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धा