शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

विकास दहियाकडे भारत ‘अ’चे नेतृत्व, एएचएल हॉकी : अमित रोहिदास उपकर्णधारपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:48 IST

आगामी २८ सप्टेंबरपासून पर्थ येथे सुरु होत असलेल्या आॅस्ट्रेलियाई हॉकी लीग (एएचएल) स्पर्धेसाठी गोलरक्षक विकास दहिया याच्याकडे भारत ‘अ’ पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

नवी दिल्ली : आगामी २८ सप्टेंबरपासून पर्थ येथे सुरु होत असलेल्या आॅस्ट्रेलियाई हॉकी लीग (एएचएल) स्पर्धेसाठी गोलरक्षक विकास दहिया याच्याकडे भारत ‘अ’ पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्याचवेळी, बचावपटू अमित रोहिदास याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.भारताच्या ‘अ’ संघात गोलरक्षक कृष्ण बी. पाठक याच्यासह बचावफळीत नीलम संजीस जेस, गुरिंदर सिंग, आनंद लकडा, बलजित सिंग आणि विक्रमजीत सिंग यांचा समावेश आहे. हरजीत सिंग, आशिष कुमार टेपनो, हार्दिक सिंग, संता सिंग आणि नीलकांत शर्मा यांचा मध्यरक्षक म्हणून समावेश आहे. तसेच अरमान कुरैशी आक्रमक फळीचे नेतृत्व करणार असून त्याच्यासह मोहम्मद उमर, सिमरनजीत सिंग, अफ्फान युसूफ आणि तलविंदर सिंग यांचा समावेश आहे.हे सलग दुसरे सत्रा आहे, ज्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आॅस्टेÑलियाई लीगमध्ये सहभागी होतील. या स्पर्धेत एकूण १० संघांचा समावेश असून भारत ‘अ’ व्यतिरिक्त न्यूझीलंड, गतविजेता व्हिक्टोरिया, नॉर्दन टेरीटेरी, साऊथ आॅस्टेÑलिया, वेस्टर्न आॅस्टेÑलिया, न्यू साऊथ वेल्स, टास्मानिया, आॅस्टेÑलिया कॅपिटल टेरीटेरी आणि क्वीन्सलँड हे संघ जेतेपदासाठी लढतील. स्पर्धेच्या ‘ब’ गटात भारतीय संघाचा समावेश असून २९ सप्टेंबरला भारत ‘अ’ संघ वेस्टर्न आॅस्टेÑलियाविरुद्ध सलामीचा सामना खेळेल. (वृत्तसंस्था)