शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भारत कोरियाविरुद्ध विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:44 IST

सलग तीन विजयासह गटात अव्वल स्थान पटकावित १० व्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पुढची फेरी गाठणाºया भारतीय संघाला बुधवारी सुपर चारच्या पहिल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

ढाका : सलग तीन विजयासह गटात अव्वल स्थान पटकावित १० व्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पुढची फेरी गाठणाºया भारतीय संघाला बुधवारी सुपर चारच्या पहिल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे.भारताने गटात सर्व सामने जिंकले होते आणि या स्पर्धेत भारतीय संघ सर्वच विभागात सरस भासत आहे. दक्षिण कोरियाविरुद्ध भारतीय संघ विजयाचा दावेदार म्हणून सुरुवात करेल. दुस-या बाजूचा विचार करता कोरियाला अद्याप छाप सोडता आलेली नाही. ‘ब’ गटात कोरिया संघ मलेशियानंतर दुसºया स्थानी राहिला.नवे प्रशिक्षक मारिन शोर्ड यांनी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर प्रथमच कुठल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने मोक्याच्या क्षणी शानदार कामगिरी केली. रमनदीप सिंग, आकाशदीप सिंग, ललित उपाध्याय व चिंगलेनसाना सिंग यांनी आघाडीच्या फळीत छाप सोडत अनेक मैदानी गोल नोंदवले. भारताची मधली फळीही नियंत्रित खेळ करीत आहे. त्यात सरदार सिंग व कर्णधार मनप्रीत सिंग यांनी मोर्चा सांभाळला आहे. बचाव फळीत अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग व युवा दीपसान तिर्की यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. भारतासाठी चिंतेचा विषय म्हणजे पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यातील अपयश हे आहे. दरम्यान, हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर काही गोल नोंदवले आहेत.या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी बघता भारतीय संघ कोरियाविरुद्ध सहज विजय नोंदविण्याची शक्यता अधिक आहे. भारताने जपानचा ५-१ ने पराभव केल्यानंतर बांगलादेशचा ७-० ने धुव्वा उडवला. त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-१ ने पराभव केला. जागतिक मानांकनामध्ये भारत आता सहाव्या तर कोरिया १३ व्या स्थानी आहे.अनुभवी गोलकिपर पी.आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत दोन युवा गोलकिपर सूरज करकेरा व आकाश चिकटे यांनी मोक्याच्या क्षणी चांगला खेळ केला. कोरियाविरुद्धच्या लढतीत भारताला आत्ममश्गुल राहता येणार नाही. कोरिया संघ वेग व जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखला जातो. दरम्यान सुपर चारच्या अन्य लढतींमध्ये बुधवारी पाकिस्तानचा सामना ‘ब’ गटातील अव्वल स्थानावर असलेल्या मलेशियाविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडाIndiaभारत