शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्चस्वाच्या लढाईसाठी हॉकी संघ सज्ज, विश्व हॉकी लीग आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:18 IST

आशियाई हॉकीचा बादशहा भारतीय संघ आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या तिसºया आणि अखेरच्या टप्प्यात जागतिक स्तरावर वर्चस्वाच्या इराद्याने उतरणार आहे.

भुवनेश्वर : आशियाई हॉकीचा बादशहा भारतीय संघ आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या तिसºया आणि अखेरच्या टप्प्यात जागतिक स्तरावर वर्चस्वाच्या इराद्याने उतरणार आहे. ब गटात भारताची सलामीला गाठ पडेल ती मागील विजेता, विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाविरुद्ध.भारताने अलीकडे ढाका येथे आशिया चषक जिंकला. आठवेळा आॅलिम्पिक विजेता असलेल्या भारताला या स्पर्धेच्या निमित्ताने आशिया बाहेरही आम्ही दमदार आहोत, हे दाखविण्याची संधी असेल.आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताला यश मिळविता आले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी, अझलान शाह चषक आणि राष्टÑकुल स्पर्धेत पराभवाची निराशा पदरी पडली होती. यानिमित्ताने दोन महिन्यांआधी रोलॅन्ड ओल्टमन्स यांच्याकडून जबाबदारी स्वीकारणारे नवे कोच शोर्ड मारिन यांचीदेखील ही पहिली परीक्षा ठरेल. कुठल्या शैलीत खेळावे हे ठरविण्याची त्यांनी खेळाडूंना मुभा दिली आहे.२०१५ मध्ये रायपूर येथे झालेल्या विश्व हॉकी लीगमध्ये भारताने कांस्य जिंकले होते. यंदा नमप्रीतसिंगच्या नेतृत्वात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असून हरमनप्रीत सिंग, सुमित, दीप्सन तिर्की, गुरजंतसिंग आणि वरुण कुमार हे युवा खेळाडू आहेत. रूपिंदरपाल सिंग आणि वीरेंद्र लाक्रा आणि अमित रोहिदास हे भक्कम बचाव करतील.ब गटात भारत आणि आॅस्ट्रेलियाशिवाय इंग्लंड आणि जर्मनी यांचा समावेश आहे. अ गटात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना, नेदरलँड, बेल्जियम आणि स्पेन हे संघ आहेत. (वृत्तसंस्था)चक दे...भारतीय खेळाडूंनी गुरुवारी कसून सराव केला. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या भारतीयांपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे मुख्य आव्हान असेल. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतSportsक्रीडा