शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हरियानाची ‘धाकड’ गोलरक्षक राष्ट्रकुलसाठी सज्ज ; टोकिओ आॅलिम्पिककडे विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:50 IST

भारत विरुध्द चीनची झुंज. सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेलेला. सगळी मदार गोलरक्षणावर होती. गोलरक्षक म्हणून उभ्या असलेल्या सविता पुनिया या हरियाणाच्या ‘धाकड गर्ल’ने एक गोल अडविला आणि चीनविरुध्दचा सामना जिंकत भारताने

शिवाजी गोरेपुणे : भारत विरुध्द चीनची झुंज. सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेलेला. सगळी मदार गोलरक्षणावर होती. गोलरक्षक म्हणून उभ्या असलेल्या सविता पुनिया या हरियाणाच्या ‘धाकड गर्ल’ने एक गोल अडविला आणि चीनविरुध्दचा सामना जिंकत भारताने अशियाई महिलांच्या हॉकी स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. हा अनुभव ‘लोकमत’शी संवादात सविताने उलगडला.फाईव्ह अ साईड हॉकी स्पर्धेसाठी पुण्यात आली असताना सविता म्हणाली, ‘‘ शूटआऊटमध्ये माझ्या मनावर खरंच खूप दडपण होतं. पण संघाचे मार्गदर्शक हरिंदर सिंग यांनी सकारात्मक मार्गदर्शन करून की तू उत्कृष्ट गोलरक्षण करणार आहेस, फक्त चेंडूकडे लक्ष केंद्रित कर. कोणतंही दडपण मनावर घेऊ नको. त्यांच्या मार्गदर्शनाने आत्मविश्वास वाढला. मला सर्वोत्कृष्ठ गोलरक्षणाचा पुरस्कार मिळाला.’’सविता हरियाणातील जोधकण (जि. सिरसा) येथील. ती म्हणते,‘‘ मी २००५ पासून हॉकी खेळायला सुरूवात केली. पण, गावातील अनेकांनी मुलीने हॉकी खेळण्याबाबत नापसंती व्यक्त केली. पण घरच्यांनी साथ दिली. आपुलकीने काळजी घेणारे मार्गदर्शक मिळाले. हरियानाकडून खेळताना माझा खेळ बहरत गेला आणि भारतीय संघात २००८ मध्ये मला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. माझ्या सरावासाठी मी भारतीय संघाचा गोलरक्षक श्रीजेश याच्या व्हिडीओ क्लीप पाहत होते, कारण मी उत्कृष्ट गोलरक्षक होण्याचा विडा उचलला होता. भारतीय संघात आल्यानंतर माझा जेव्हा सराव सुरू झाला तेव्हा मला माझ्या चुका सुधारण्याची संधी मिळाली. ’’सविता म्हणाली, ‘‘हरिंदर सिंग नेहमी मुख्य सराव झाल्यानंतर शूटआऊटमध्ये कसे गोलरक्षण करायचे, याचे मार्गदर्शन करायचे. पेनल्टी शुटआऊटमध्ये आपले मन नेहमी शांत ठेवायचे असते. लक्ष चेंडूकडेच हवे. या वेळी तंदुरुस्ती, चपळता आणि आत्मविश्वास याचा कस लागणार आहे. त्यामुळे तुला खूप शांत राहून लक्षपूर्वक गोलरक्षण करायचे आहे. ’’ंराष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेनंतर टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेकडेआमचे विशेष लक्ष असेल. नुकत्याच झालेल्या आशियाई चषक स्पर्धेत आमच्याकडून झालेल्या चुका आम्ही आता या सराव शिबिरामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करून पुढील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज राहू, असे सविता पुनिया म्हणाली.

टॅग्स :HockeyहॉकीSavita Puniaसविता पुनिया