शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरियाविरुद्ध हरमनप्रीतची हॅट्ट्रिक,भारताचा ४-१ ने विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 03:37 IST

हरमनप्रीतसिंग याने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन फेरीत विजयी मोहीम कायम राखून द. कोरियाचा ४-१ ने पराभव केला.

मस्कत : हरमनप्रीतसिंग याने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन फेरीत विजयी मोहीम कायम राखून द. कोरियाचा ४-१ ने पराभव केला. बुधवारी उशिरा रात्री झालेल्या लढतीत हरमनप्रीतने पाचव्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. ४७ आणि ५९ व्या मिनिटाला आणखी दोन गोल नोंदवित त्याने स्पर्धेत तिसऱ्या हॅट्ट्रिकची नोंद केली. याआधी दिलप्रित सिंग आणि पाकिस्तानचा अलीम बिलाल यांनी हॅट्ट्रिक नोंदविली आहे.भारताकडून गुरजंतसिंग यानेही दहाव्या मिनिटाला गोल केला. द. कोरियासाठी ली सिऊनजील याने २० व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविला. भारताचे पाच सामन्यात १३ गुण झाले असून नोंदविलेल्या गोलची संख्या २५ अशी झाली. मलेशियाचे चार सामन्यात दहा गुण आहेत. गुणतालिकेत पाकिस्तान तिसºया आणि जपान चौथ्या स्थानावर आहे. भारत, मलेशिया, पाक आणि जपान यांनी आधीच उपांत्य फेरी गाठली, हे विशेष. मलेशियाविरुद्ध गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्यानंतर भारताने कोरियाविरुद्ध आक्रमक सुरुवात केली.पाचव्या मिनिटाला पेनल्टीकॉर्नर मिळताच हरमनने त्यावरगोल केला. कोरियानेही हल्ले सुरू करताचा जागतिक क्रमवारीतपाचव्या स्थानी असलेल्या भारताने देखील प्रत्युत्तर दिले. हरमननेडी च्या आत दिलेल्या पासवरगुरजंतने रिव्हर्स हिट करीत गोल नोंदविला. (वृत्तसंस्था)>दक्षिण कोरियाने आघाडीची संधी घालवलीदुसºया क्वार्टरमध्ये कोरियाने खाते उघडताच मध्यांतराच्यावेळी भारत २-१ ने पुढे होता. तिसºया क्वार्टरमध्ये कोरियाने लगेच गोल नोंदविला होता पण भारतीय खेळाडूंनी रेफ्रल घेताच पंचांनी गोल अमान्य केला.चौथ्या क्वार्टरमध्ये हरमनने तिसरा गोल केला. दुसरीकडे कोरियाला मिळालेले दोन्ही पेनल्टी कॉर्नर वाया गेले. हरमनने ५९ व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवून भारताचा ४-१ ने विजय निश्चित केला.>पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्यात यश आल्याबद्दल मी आंनदी आहे. मी माझ्या खेळावर फोकस केल्यामुळे पाठोपाठ गोल नोंदविण्यात यशस्वी झालो.’ शनिवारी भारताला उपांत्य सामना खेळायचा आहे.- हरमनप्रीत

टॅग्स :Hockeyहॉकी