शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

FIH Women's Hockey World Cup : भारतीय महिला संघाला शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 20:43 IST

लंडन - जागतिक क्रमवारीत पिछाडीवर असलेल्या आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय महिला संघाचे हॉकी विश्वचषक स्पर्धेतील आव्हान खडतर झाले आहे. भारतीय महिला संघाला बाद फेरीतील आशा कायम राखण्यासाठी रविवारी होणा-या सामन्यात अमेरिकेविरूद्ध सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. भारताला या सामन्यात बरोबरीही पुरेशी ठरणारी आहे.भारतीय महिलांनी सलामीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुस-या ...

लंडन - जागतिक क्रमवारीत पिछाडीवर असलेल्या आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय महिला संघाचे हॉकी विश्वचषक स्पर्धेतील आव्हान खडतर झाले आहे. भारतीय महिला संघाला बाद फेरीतील आशा कायम राखण्यासाठी रविवारी होणा-या सामन्यात अमेरिकेविरूद्ध सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. भारताला या सामन्यात बरोबरीही पुरेशी ठरणारी आहे.

भारतीय महिलांनी सलामीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या इंग्लंडला झुंजवले होते. मात्र, अखेरच्या क्षणाला इंग्लंडने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. ब गटातील दुस-या लढतीत आयर्लंडने 1-0 अशा फरकाने भारताला पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाची उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवण्याची संधी हुकली.  

चार गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार आहेत, तर अन्य चार जागांसाठी प्रत्येक गटातील दुस-या व तिस-या स्थानातील संघ एकमेकांशी भिडणार आहेत. भारतीय संघ गटात सध्या तिस-या स्थानावर आहे. अमेरिका आणि भारत यांचे समसमान गुण आहेत. मात्र, गोलफरकाने भारत आघाडीवर आहे आणि त्यामुळे त्यांना अमेरिकेविरूद्ध बरोबरीही पुरेशी आहे. 

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक हे म्हणाले की, 'रविवारी होणा-या सामन्यात आम्हाला विजय अनिवार्य आहे. संघातील खेळाडूंमध्ये योग्य समन्वय आहे. त्यामुळे आम्ही गोल करण्याच्या अधिक संधी निर्माण करत आहोत. मात्र त्यावर गोल करण्यात आम्हाला हवे तसे यश मिळत नाही. संघाला हेच महागात पडत आहे. त्यावर संघ काम करत आहे.  

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा