शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना वायरसच्या भीतीमुळे अझलान शाह हॉकी स्पर्धा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 04:19 IST

जगभरात नोवेल कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन सोमवारी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेचे २९ वे पर्व एप्रिल ऐवजी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : जगभरात नोवेल कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन सोमवारी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेचे २९ वे पर्व एप्रिल ऐवजी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात निर्णय घेण्यात आला. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार अझलान शाह चषक स्पर्धेचे आयोजन मलेशियातील इपोहमध्ये ११ ते १८ एप्रिल या कालावधीत होणार होते, पण आता ही स्पर्धा २४ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर या कालावधीत होईल. यात नियमितपणे सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचा यावेळी स्पर्धेत सहभागी होण्याचा कार्यक्रम नाही.आयोजन समितीचे अध्यक्ष डेतो हाजी अब्द रहीम विन मोहम्मद यांनी सांगितले की, ‘हा निर्णय खेळाडू, अधिकारी व सर्व बाजूंचा विचार करुन घेण्यात आला असून सुलतान अझलान शाह चषक पुरुष हॉकी स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.’ आयोजन समितीने त्यामुळे होणाºया त्रासासाठी क्षमा मागितली आहे, पण सध्याचे संकट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले.आयोजन समितीनुसार एफआयएच (आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ), एएचएफ (आशियाई हॉकी महासंघ), एमएचसी (मलेशिया हॉकी महासंघ) व स्पर्धेत सहभागी होणाºया संघांना या निर्णयाची माहिती देण्यात आलेली आहे. धोकादायक कोरोना व्हायारसमुळे यापूर्वीही अनेक स्पर्धा रद्द, स्थगित किंवा स्थानांतरित कण्यात आलेल्या आहेत. (वृत्तसंस्था)>आशियाई चालण्याची शर्यत रद्दजपानमध्ये १५ मार्च रोजी प्रस्तावित असलेली २० किमी आशियाई पायी चालण्याची शर्यत कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे रद्द झाली आहे. या स्पर्धेत १३ धारतीय स्पर्धक सहभागी होणार होते. टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भावना जाट ही नोमी शहरात होणाºया या स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणार होती. जपानच्या महासंघाने केुलेल्या विनंतीवरून आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Hockeyहॉकी