शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

12 ऑगस्ट... आजच्याच दिवशी भारताच्या क्रीडाविश्वात घडला होता 'सोनेरी' इतिहास!

By स्वदेश घाणेकर | Updated: August 12, 2018 14:11 IST

भारतीय संघाचा ऑलिम्पिक इतिहास आठवला तर पुरूष हॉकी संघाची यशोगाथा चटकन समोर उभी राहते. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नावावर 9 सुवर्ण, 7 रौप्य व 12 कांस्य अशी एकूण 28 पदकं आहेत.

भारतीय संघाचा ऑलिम्पिक इतिहास आठवला तर पुरूष हॉकी संघाची यशोगाथा चटकन समोर उभी राहते. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नावावर 9 सुवर्ण, 7 रौप्य व 12 कांस्य अशी एकूण 28 पदकं आहेत. यापैकी आठ सुवर्ण ही पुरूष हॉकी संघाने जिंकून दिली आहेत. कालांतराने भारतीय हॉकी ऑलिम्पिक स्पर्धेत पिछाडीवर गेली, परंतु त्यांचा सुवर्ण इतिहास अजूनही अनेकांना प्रेरणा देणारा ठरत आहे. 

भारतीय पुरूष हॉकी संघाने 1928 ते 1956 अशी सलग सहा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकली. पण, त्यापैकी तीन पदकांची नोंद ही ब्रिटीश इंडिया संघाखाली झालेली आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला आणि पुढच्याच ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू तिरंग्याखाली खेळले. लंडन येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे 79 खेळाडू 10 क्रीडा प्रकारांत पदक पटकावण्यासाठी सहभागी झाले होते. पण भारताला त्या स्पर्धेत केवळ एकाच पदकावर समाधान मानावे लागले होते. हॉकी संघाने भारताला सुवर्णपदक पटकावून दिले.

स्वातंत्र्यानंतर तिरंग्याखाली भारताने पटकावलेले ते पहिलेच ऑलिम्पिक सुवर्णपदक होते. 12 ऑगस्ट 1948 हा तो ऐतिहासिक दिवस जेव्हा लंडनच्या विम्बेली स्टेडियमवर 25 हजार प्रेक्षकांसमोर तिरंगा डौलाने फडकला होता. इंग्रजांना भारतातून पिटाळल्यानंतर त्यांच्याच मायभूमीत त्यांना नमवून भारताने हे सुवर्णपदक जिंकले होते. बलबिर सिंग (Sr.) यांनी दोन गोल करत विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांना पॅट्रीक जान्सेन आणि लिओ पिंटो यांनी प्रत्येकी एक गोलची साथ देत ग्रेट ब्रिटनचा 4-0 अशा धुव्वा उडवला. 

भारत-पाकिस्तानचा संयुक्त संघ?

1948च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांचा संयुक्त हॉकी संघ खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला आणि दोन्ही देशांनी आपापले स्वतंत्र संघ पाठवले. पाकिस्तानला या स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकाच्या पहिल्या लढतीत नेदरलँड्सने 1-1 अशी बरोबरी मिळवली आणि परतीच्या सामन्यात नेदरलँड्सने 4-1 असा विजय मिळवला. भारताचा सुवर्णमयी प्रवासविजयी वि. ऑस्ट्रीया 8-0विजयी वि. अर्जेंटिना 9-1विजयी वि. स्पेन 2-0 विजयी वि. नेदरलँड्स 2-1 (उपांत्य फेरी)विजयी वि. ग्रेट ब्रिटन 4-0 ( अंतिम) 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतSportsक्रीडा