शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मटक्याच्या पैशातून ‘त्या’ युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:22 IST

वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदा : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे.वाई गोरखनाथ येथील यूवक नागराज खंदारे (२८) याचा मृतदेह चोंडी रेल्वेस्टेशन येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात सापडला होता. मयत हा मिस्त्री काम करतो. त्याला मटका लागला होता. त्यामुळे मटका एजन्टकडे पैसे मागण्यासाठी तो गेला असता मटका एजन्ट व मयत नागराज खंदारे यांच्यामध्ये वाद झाला. मटक्याची उधारी देण्यावरुन झालेल्या वादानंतर पाच जणांनी मिळून लाथाबुक्याने मारहाण केली होती. त्यात मयत नागराज खंदारे हा जागीच मरण पावला आहे. ही घटना ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडली होती. सकाळी १ नोव्हेंबर रोजी मयताचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. काही संशयीतांना पोलिसांनी त्याच दिवशी ताब्यात घेऊन चौकशी केली. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. सदर घटनेमुळे मागील काही दिवसांपासून परिसरात उलटसुलट चर्चेला ऊत आला होता. अखेर याप्रकरणी पाचव्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी बाबाराव खंदारे यांच्या फिर्यादीवरुन करुंदा पोलीस ठाण्यात आरोपी राहुल सरोदे, अशोक सरोदे, संदीप मोरे, सुमित सरोदे, राहुल मगरे (सर्व रा. चोंढी रेल्वेस्टेशन) या पाच जणांविरोधात भादंवि कलम ३०२, २०१,१०९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. मटक्याचा जुगार लागला होता त्यातून या मयताचा बळी गेला आहे. या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशिराने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अजून फरारच आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.४७ वाहनचालकांवर कारवाई; दंड वसूलहिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ४७ वाहन चालकांकडून पोलिसांनी ९ हजार ४०० रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहीम राबविण्यात येते. त्या अनुषंगाने मंगळवारी ही कारवाई केली.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी