शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

ठिय्या आंदोलनात महिला सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:28 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन नवव्या दिवशी मंगळवारी महिलांनी सहभाग घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत शासनाविरोधात घोषणाबाजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन नवव्या दिवशी मंगळवारी महिलांनी सहभाग घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत शासनाविरोधात घोषणाबाजी केली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. हिंगोली येथील मा. गांधी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी पोवाडे गाण्यात आले. यावेळी महिला व युवतींची आक्रमक भाषणेही झाली. मुख्यमंत्र्यांच्या फोटोसमोर महिलांनी बांगड्या फेकत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. यावेळी एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी गांधीचौक परिसर दणाणून गेला होता. दुपारी ३ च्या सुमारास शेकडो महिलांनी गांधीजींच्या पुतळ्याला मानवी साखळी करत रिंगण घातले. अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा समाजाला हिंसक आंदोलन करण्यास प्रवृत्त करू नये, असा इशाराही यावेळी महिलांनी दिला. शासनाचा निषेध म्हणून अनेक महिलांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या.आयुक्तांचे निवेदन फेटाळले; आमदारांच्या घरासमोर ठिय्या४मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार औरंगाबाद विभागाच्या आयुक्तांनी हिंगोली येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी तहसीलदार गजानन शिंदे यांनी आरक्षणाबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करीत असल्याचे निवेदन सादर केले. परंतु मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रच्या वतीने ९ आॅगस्टला बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद हिंगोली जिल्ह्यातही पाळण्यात येणार असून, याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील मराठा आमदारांच्या घरासमोर ८ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.पं. स. सदस्यांचे राजीनामे४सेनगाव : तालुक्यातील पानकनेरगाव पंचायत समिती गणाचे काँग्रेसचे सदस्य संतोष खोडके व पुसेगाव गणाचे शिवसेनेचे सदस्य सुनील मुंदडा यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे या करिता राजीनामा दिले. सेनगाव पंचायत समितीच्या दोन पंचायत समिती सदस्यांनी मंगळवारी पं.स.च्या सभापतींकडे राजीनामे सादर केले आहेत. राजीनामे सादर करून शासनाविरूद्ध रोष व्यक्त केला.सेनगाव येथे ठिय्या आंदोलन सुरूच; संघटनांचा पाठिंबासेनगाव : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणी करिता सेनगाव तहसील कार्यालयासमोर सूरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा देणाऱ्या समाज, संघटनेची संख्या वाढली असून ठिय्या आंदोलन व्यापक होत आहे. मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही विविध समाज व संघटनांकडून पाठिंबा देण्याची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आरक्षण मिळाल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही. ही भूमिका घेऊन तहसील कार्यालयालासमोर बसलेल्या मराठा समाज बांधवांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी आंदोलनाला डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, राजस्थानी समाज बांधव, मुस्लिम समाज बांधव, वीरशैव समाज संघटना, कृषी असोसिएशन इ. संघटनांच्या पदाधिकाºयांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आरक्षणाच्या मागणीला लेखी पाठिंबा दिला. या संबंधी सर्वांनी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देऊन तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली. प्रशासनाचा वतीने विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांचे आरक्षणाबाबत शासन सकारात्मक प्रयत्न करीत असल्याचे पत्र तहसीलदार वैशाली पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन दिले. आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; परंतु आंदोलनकर्त्यांनी या विनंतीला दाद न देत, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा घेतला.वसमत : येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह आंदोलकावरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. आरक्षणासाठी बलिदान देणाºया तरुणाच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर मागील पाच दिवसापासून सूरू ठिय्या आंदोलन सुरू आहे. ७ आॅगस्ट रोजी सहाव्या दिवशी आंदोलकांनी मुंडण करून ठिय्या करत सरकारचा निषेध केला. आंदोलनाची जबाबदारी टेंभुर्णी सर्कलमधील समाजबांधवांनी सांभाळली. यावेळी हिंगोली जिल्हा केमिस्ट्री अ‍ॅन्ड ड्रगिस्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वसमत, वकील संघ वसमत आदींनी आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच ३०० च्या वर आंदोलकांनी मुंडण केले. ठिय्या आंदोलकांची तहसीलदार ज्योती पवार यांनी मंगळवारी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे आवाहनपत्र आंदोलकांसमोर वाचून दाखवले. आंदोलकांनी ते पत्र स्वीकारण्यास नकार दिला व ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा