लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५. ३० च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरवात झाली. त्यामुळे हळद शिजविणा-यांची एकच धांदल उडाली होती. वा-यामुळे अस्ताव्यस्त साहित्य उडत होते.शनिवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारे आल्यामुळे रस्त्यावरुन वाहने चालविणेही कठीण होऊन बसले होते. आखाडा बाळापूर परिसरातही तासभर वादळी वारे सुरु होते. त्यामुळे दुचाकी स्वरांनी घरांचा किंवा भिंतीचा आडोसा घेत वाºयांपासून बचाव केला. सध्या जिल्हाभरातील शेतकºयांनी हळद काढून वाळवण्यासाठी ठेवली असता वाºयामुळे एकच धांदल उडाली.
हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:17 IST