शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

...तर वेतन व भत्त्यांतून होणार अग्रीम कपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:58 AM

जिल्हा परिषदेत विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अग्रीमाचा हिशेब विहित पद्धतीत सादर करणे गरजेचे असते. मात्र तो दिलाच नसल्याने जि.प.ची ५६ लाखांची रक्कम अडकून पडली. एकतर हिशेब सादर करा अन्यथा वेतनातून ही रक्कम कपात करण्याचा आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अग्रीमाचा हिशेब विहित पद्धतीत सादर करणे गरजेचे असते. मात्र तो दिलाच नसल्याने जि.प.ची ५६ लाखांची रक्कम अडकून पडली. एकतर हिशेब सादर करा अन्यथा वेतनातून ही रक्कम कपात करण्याचा आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काढला आहे.जि.प.कडून वेगवेगळ्या कारणांसाठी अग्रीम स्वरुपात अधिकारी-कर्मचाºयांना रक्कम दिली जाते. जि.प. व पं.स. लेखा संहिता १९६८ च्या नियम २0१ ब अन्वये दिलेल्या अग्रीमाचे समायोजन तीन महिन्याच्या आत करणे बंधनकारक असते. प्रमाणके व आदेशासह ते सादर करावे लागते. मात्र अनेक अर्धशासकीय पत्रे दिल्यानंतरही हा हिशेब सादर केला जात नाही. त्यामुळे प्रलंबित अग्रीम प्रकरणात दरसाल दर शेकडा १८ टक्के चक्रवाढ व्याजदराने विद्यमान विभागप्रमुखांच्या वेतन व भत्त्यातून अग्रीम रक्कम व व्याजाची रक्कम वसूल करण्याचा इशारा दिला. तर एखाद्या विभागप्रमुखाची बदली झाली असल्यास त्यांच्या अंतिम वेतन प्रमाणपत्रावर प्रलंबित रक्कमेची नोंद करून प्रमाणपत्र देण्यात येईल, असे बजावले आहे.२0१२ ते १८ या कालावधीत विविध विभागांनी घेतलेल्या अग्रीमाची रक्कम जवळपास ५0 लाखांच्या वर आहे. यामध्ये आरोग्य विभागाकडे २.५९ लाख, शिक्षण विभागाकडे ३३ लाख, सामान्य प्रशासन ७0 हजार, बांधकाम ११ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा १.५ लाख अशी रक्कम आहे. या पाचही विभागाच्या प्रमुखांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पत्र दिले आहे. त्यामुळे जि.प.त अधिकारी हादरले असून यापुढे अग्रीमाचा हिशेब तत्काळ सादर होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. वर्षानुवर्षे हिशेब न देणाºयांना या निर्णयामुळे चांगलीच चपराक बसणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वित्त विभागाकडून यासंदर्भात पुढील कार्यवाही होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद