शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

मिशी कधी काढणार? भर सभेत दिलेले चॅलेंज आमदार संतोष बांगर यांच्या अंगलट

By विजय पाटील | Updated: May 2, 2023 18:42 IST

''सतरापैकी सतरा जागा निवडून नाही आणल्या न तर मिशी ठेवणार नाही. हं...आपल्याकडे ते काही जमतच नाही.''

हिंगोली : नुकत्याच बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यात कळमनुरी बाजार समितीत १७ पैकी १७ जागा निवडून न आल्यास मिशी ठेवणार नाही, अशी वल्गना आ.संतोष बांगर यांनी जवळा बाजार येथे प्रचारात केली होती. आता त्यांच्या पॅनलच्या पाचच जागा आल्याने हा व्हिडीओ व्हायरल केला जात असून मिशी कधी काढणार? असे उपहासात्मकरीत्या विचारले जात आहे.

आ.संतोष बांगर आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिले आहेत. यामुळे ते अनेकदा अडचणीतही आले. मात्र तरीही त्यांची बेधडक वाणी कानी पडायचे थांबले नाही. शिंदे गटाची भाजपसोबत युती असल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे त्यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार सभा घेतली. भाषणादरम्यान त्यांना चांगलेच स्फुरण चढले. यावेळी बोलताना ते म्हणाले, फक्त भाजप आमच्या सोबत आहे. बाकी  राष्ट्रवादी, उरली सुरली शिवसेना, काँग्रेस वंचित हे सगळे एक झाले. पण आजही तुम्हाला सांगतो, नागनाथाच मंदिर येथे समोर आहे. सतरापैकी सतरा जागा निवडून नाही आणल्या न तर मिशी ठेवणार नाही. हं... आपल्याकडे ते काही जमतच नाही. म्हणूनच सांगतो १७ पैकी १७ जागा आणणार, असा दावा त्यांनी केला होता.

कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीच्या १२ तर शिवसेना व भाजप युतीच्या ५ जागा आल्या. त्यातही शिंदे गटाच्या तीनच आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल करून विरोधक आ.संतोष बांगर यांना डिवचत आहेत. मिशी कधी काढणार? अशी विचारणा केली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीShiv Senaशिवसेना