शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही कुणबी; पती मराठा, मग आता तुम्हीच सांगा आमच्या मुलांना काही नाही आरक्षण?

By रमेश वाबळे | Updated: October 30, 2023 18:08 IST

साटंबा येथील कुणबी महिलांनी सरकारपुढे ठेवला यक्ष प्रश्न

हिंगोली : विदर्भातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असून, त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभही मिळतो. परंतु, मराठवाड्यात मात्र त्यांच्या अपत्यांना कुणबी आरक्षणाचा लाभ मिळत नाही हा कुठला न्याय? असा यक्ष प्रश्न हिंगोली तालुक्यातील साटंबा येथील महिलांनी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारपुढे ठेवला आहे.

विदर्भात जन्मलेल्या अनेक मुलींचे विवाह मराठवाड्यातील मुलांशी झाले आहेत. लग्नानंतरही त्या मुलींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो. निवडणुकीत शंभर रूपयांच्या मुद्रांकावर शपथपत्र देवून त्या महिलांना ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविता येते. परंतु, त्यांचे पती व आपत्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. हे असे का व्हावे? याचा कधी सरकारने ७० वर्षात विचारही केला नाही. परंतु, हे वास्तव आहे, म्हणून आज हा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आम्ही कुणबी आणि पती मराठा तर आमच्या मुलांची जात सरकारने सांगावी?, मराठा एकच असतानाही सरकारच्या नजरेत ओबीसी आणि मराठा वेगळे असतील तर अंतरजातीय विवाह  शासनाच्या योजनेतंर्गत ५० हजार आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनचे अडीच लाख रूपये देण्यात यावेत, निवडणुकीसाठी एका बाॅन्डवर जात बदल होवू शकतो तर आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जात बदल का होवू शकत नाही, सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे अथवा सामूहिक फारकत नामा घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी साटंबा येथील कुणबी महिलांनी केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला, पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षण