शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:28 IST

वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी, परिसरातील सर्वच जलस्त्रोत आटले आहेत. येथील शेतकरी राजू शेख हे हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहेत.  

लोकमत न्यूज नेटवर्कहयातनगर : वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी, परिसरातील सर्वच जलस्त्रोत आटले आहेत. येथील शेतकरी राजू शेख हे हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहेत.  पावसाच्या लहरीपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, हळद इ. पिके हातची गेली. सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघाला नाही. सिंचनासाठी पाणीच नसल्याने आता शेवटच्या टप्प्यात असलेली हळदही करपून जात आहे.आतापर्यंत हळदीवर केलेला खर्च वाया जाण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकरी हळदीला टँकरने पाणी देऊन जगवण्याची धडपड करत असल्याचे चित्र दिसत आहे.दुष्काळाने पाणीप्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी चिंतातुर दिसत आहेत. शेतकरी राजू शेख यांच्याकडे सिंचनासाठी विहीर व बोअरवेल आहेत. पण डिसेंबरमध्येच जलस्त्रोत आटल्याने आता विकतचे पाणी देऊन पिके वाचवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शेख यांनी तीन एकर हळदीची लागवड केली होती.पाण्याअभावी अडीच एकर हळद करपून गेली. वीस गुंठे हळदीची जोपासना ते पुढच्या वर्षी बेण्यासाठी करत आहेत.यंदा पिकांवर विविध रोगांचे प्रादुर्भाव झाल्याने खर्च प्रचंड वाढला. उत्पन्नाची आशाही मावळली आहे. शासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी राजू शेख यांनी केली आहे.बेण्यासाठी टँकरने पाणी४यंदा तीन एकर जमिनीवर हळद लागवड केली आहे. पाऊस कमी झाल्याने विहीर, बोअरला खडा लागला. त्यामुळे पाण्याअभावी अडीच एकर हळद सोडून दिली. पुढच्या वर्षी बेण्यासाठी हळद रहावी म्हणून अर्धा एकर हळदीला टँकरने पाणी देऊन जतन करत असल्याचे हयातनगर येथील शेतकरी राजू शेख म्हणाले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईFarmerशेतकरी