शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: अलौकिक! आकाशात अवतरले इंद्रधनुष्याचे रिंगण; शहर काहीवेळासाठी स्तब्ध

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: August 2, 2024 18:36 IST

लहान-मोठ्यांनी रंगेबेरंगी इंद्रधनुष्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

- इस्माईल जहागिरदारवसमत: मागच्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असून वातावरणही काहीवेळ ढगाळमय राहत आहे. शुक्रवारी एक वाजेदरम्यान आकाश निरभ्र राहताच इंद्रधनुष्याचे रिंगण पहायला मिळाले. त्यावेळी लहान-मोठ्यांनी रंगेबेरंगी इंद्रधनुष्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

शहरात २ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेदरम्यान आकाश निरभ्र राहिले. तबकडी सारखे आणि रंगेबेरंगी असे चित्र पाहून अनेकांना कौतुक वाटत असतानाच तो इंद्रधनुष्य आहे याची खात्री पटली. त्यामुळे अनेकांनी आपल्या घराच्या गच्चीवर, उंच टेकडीवर जावून इंद्रधनुष्य कॅमेऱ्यात कैद करणे सुरु केले. जवळपास १० ते १५ मिनिटे हे इंद्रधनुष्याचे दृश्य नागरीक कुतुहलाने पाहत होते. अनेकांनी इंद्रधनुष्याची हालचाल व्हिडीओ तयार करुन इतरांना पाठविला. सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होताच शहरातील चौक, बसस्थानक परिसर, परभणी रोड, मुख्य बाजारपेठ आदी ठिकाणी युवकांनी इंद्रधनुष्याचा व्हिडिओ व्हायरल करणे सुरु केले.

‘इंद्रधनुष्या’ मुळे शहर दहा मिनिटे झाले स्तब्ध...वसमत शहर हे हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांच्या मुख्य रस्त्यांवर आहे. त्यामुळे वाहनांचा गोंगाट नेहमीच ऐकायला मिळतो. परंतु २ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेदरम्यान मात्र शहर एकदम स्तब्ध राहिले. आपल्या शहरात काय होत आहे हे नातेवाईकांना कळावे म्हणून युवकांनी काही क्षणातच इंद्रधनुष्याचे लाईव्ह देखावा मोबाइलमध्ये कैद केला व व्हॉटस्अपद्वारे पाठवून देत होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस