शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Video: हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील व्हीसी रूमला भीषण आग

By विजय पाटील | Updated: November 22, 2023 14:31 IST

हिंगोली जिल्हा परिषदेच्या अभ्यागत कक्षामागे असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली.

हिंगोली: जिल्हा परिषदेतील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूमला लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने अल्पावधीतच हे आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

हिंगोली जिल्हा परिषदेच्या अभ्यागत कक्षामागे असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागण्याचा अंदाज आहे. या आगीमध्ये या हॉलमधील फर्निचरसह व्हिडिओ कॉन्फरन्स यंत्रणा पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या ठिकाणी एक मोठी स्क्रीन, इंटरनेट यंत्रणा, माइक यंत्रणा तसेच बॅटऱ्या व इतर उपकरणे होती. गरजेच्या वेळीच या रूममध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वावर असतो. आज कोणत्याही काम नसल्याने ही खोली बंद होती.

दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक धुराचे लोट व आवाज झाल्याने ही आग लक्षात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचारी तत्काळ आवारात दाखल झाले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले यानंतर लागलीच कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या अग्निशामक पथकाला पाचारण केले. या पथकाने अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. या आगीचा फटका इतर विभागांना बसला नसला तरीही वृत्तही लिहीपर्यंत नेमके नुकसान किती याचा अंदाज आला नव्हता.

याठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, आत्माराम बोंद्रे, गणेश वाघ, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिगंबर माडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेळके आदींनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून आग आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजनेसाठी प्रयत्न केले. अग्निशामक दल दाखल झाल्यानंतर  मुख्याधिकारी अरविंद मुंडे पोलीस निरीक्षक विकास पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या आगीचे वृत्त  कळताच बघ्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfireआग