शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री अब्दूल सत्तार-आमदार नवघरे यांच्यात शाब्दिक चकमक; नियोजन समितीच्या बैठकीत खूर्चीवरून वाद

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: October 28, 2022 18:05 IST

 बैठकीत व्यासपीठावर आमदार नवघरे यांच्यासाठी खूर्चीच नसल्याने ते समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले होते. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

हिंगोली: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्यासपीठावरील खुर्चीवरून पालकमंत्री अब्दूल सत्तार व आमदार राजू नवघरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.  बैठकीत व्यासपीठावर आमदार नवघरे यांच्यासाठी खूर्चीच नसल्याने ते समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले होते. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पालकमंत्री अब्दूल सत्तार यांच्यासह आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सभागृहात दाखल झाले. यावेळी आमदार राजू नवघरे हेही सभागृहात दाखल झाले. मात्र त्यांना बसण्यासाठी व्यासपीठावर खुर्ची नव्हती. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करून समोर अधिकाऱ्यांसाठी असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. 

यावेळी पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी आमदार नवघरे यांना बैठक दहा वाजता असतांना तुम्ही साडेदहा वाजता आले. जस जसे आमदार आलेत त्या प्रमाणे खुर्चीची व्यवस्था केली असल्याचे म्हणाले. मात्र आमदार नवघरे यांनी आपण दहा वाजताच आलो असल्याचे सांगितले. खुर्चीवरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांना देखील काय होत आहे कळेनासे झाले होते. पालकमंत्री सत्तार यांनी आमदार नवघरे यांच्यासाठी व्यासपीठावर जागा देण्याच्या सूचना दिल्यानंतर व्यासपीठावर खूर्ची ठेवण्यात आली. त्यानंतरच बैठकीला सुरूवात झाली. 

आदित्य ठाकरे म्हणजे छोटा पप्पू - हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. एका प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणजे छोटा पप्पू असे ते म्हणाले. तसेच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचाही अंब्या असा उल्लेख करून त्यांना विरोधी पक्षनेते पदाचे काहीही कळत नसल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारHingoliहिंगोलीMLAआमदारAditya Thackreyआदित्य ठाकरे