चेसिस, इंजिन क्रमांकाच्या आधारे करता येणार वाहनांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:49+5:302021-05-06T04:31:49+5:30

हिंगोली : भारत स्टेज-६ या वाहनांची विक्री १३ एप्रिल २०२१ पूर्वी झालेली आहे, अशा वाहनांच्या चेसिस व इंजिन क्रमांकाच्या ...

Vehicles can be registered on the basis of chassis, engine number | चेसिस, इंजिन क्रमांकाच्या आधारे करता येणार वाहनांची नोंदणी

चेसिस, इंजिन क्रमांकाच्या आधारे करता येणार वाहनांची नोंदणी

Next

हिंगोली : भारत स्टेज-६ या वाहनांची विक्री १३ एप्रिल २०२१ पूर्वी झालेली आहे, अशा वाहनांच्या चेसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे वाहन विक्रेत्याने ऑनलाईन अर्ज, फॉर्म क्र. २०, २१, विमा पुरावा व पत्त्याचा पुरावा सादर केल्यास असे अर्ज वाहन नोंदणीसाठी स्वीकारण्यात यावे, अशा सूचना परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत जारी करण्यात आल्या आहेत.

या सूचनांमध्ये भारत स्टेज-६ या वाहनाची विक्री १३ एप्रिल पूर्वी झालेली आहे अशा वाहनांच्या चेसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे वाहन विक्रेत्याने ऑनलाईन अर्ज, फॉर्म क्र. २०, २१, विमा पुरावा व पत्त्याचा पुरावा (वितरकांनी प्रमाणित करून) सादर केल्यास अर्ज वाहन नोंदणीसाठी स्वीकारण्यात यावा, तसेच वाहन वितरकांनी वरीलप्रमाणे अर्ज सादर करतेवेळी त्यांनी सर्व कागदपत्र तपासली असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे, या प्रमाणपत्रासोबत वाहनाच्या चेसिस क्रमांकाची पेन्सिल प्रिंट व छायाचित्र कार्यालयाच्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे, तसेच वाहन वितरकांनी अर्ज सादर करतेवेळी एक हमीपत्र सादर करावे लागणार आहे. हमीपत्रात कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वाहन नोंदणीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची विनंती करीत आहे. सदर वाहने तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश दिल्यास ही वाहने शक्य तितक्या लवकर हजर करण्याची हमी घेत असल्याचा उल्लेख करावा लागणार आहे.

Web Title: Vehicles can be registered on the basis of chassis, engine number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.