शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वरुड येथे ग्रामपंचायत सदस्याच्या पती व सास-याने ग्रामसेवकास बदडले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 19:13 IST

सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील ग्रामसेवकास बाप लेकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी १०. ३० वाजता घडली. मारहाण करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले आहे.  

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील ग्रामसेवकास बाप लेकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी १०. ३० वाजता घडली. मारहाण करणारे ग्रामपंचायत सदस्यांचे पती व सासरे आहेत. त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी कि, वरुड चक्रपान येथील ग्रामसेवक अरुण बबनराव वाबळे हे नेहमी प्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत बसले होते. याच दरम्यान, येथील महिला ग्रा. पं. सदस्या रुख्मिनाबाई आदमाने यांचे पती विजय आदमाने व सासरे रामराव आदमाने तेथे आले. या दोन्ही बाप लेकांनी ग्रामसेवक वाबळे यांना, 'तुम्ही चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाचे काय नियोजन केले, गावात आल्यानंतर व येण्या अगोदर मला फोन का करत नाहीत,विकास योजनेची माहिती मला वयक्तिक फोन करुन का देत नाहीत' असे म्हणत वाद घातला. त्यानंतर लाथा बुक्क्याने मारहाण करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

मारहाणीत वाबळे यांच्या पोटात मार लागल्याने ते खाली कोसळले. यावेळी कार्यालयातील उपस्थित जगन्नाथ चोपडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा दोघांनी मारहाण केली. याप्रकरणी ग्रामसेवकास वाबळे यांच्या फिर्यादीवरुन विजय आदमाने व रामराव आदमाने यांच्याविरुद्ध मारहाण करीत जिवे मारण्याच्या धमक्या देणे, शासकीय कामात अडथळा आणणे, कार्यालयीन कागदपत्रे फाडणे आदी यावरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि मधुकर कारेगावर करत आहेत. 

ग्रामसेवक संघटना रस्त्यावर उतरणार ग्रामसेवक वाबळे यांना झालेल्या मारहाणीचा सेनगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. वाबळे यांना मारहाण करणार्‍या आरोपीना अटक होईपर्यंत ग्रामसेवक संघटना कामबंद आंदोलन करणार आहे. झालेली घटनाही निंदणीय असून, या प्रकाराने ग्रामसेवकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनामुळे गावातील विकास कामाना तर खिळ बसेलच त्याच बरोबर ग्रामसेवकांना सार्वजनिक दृष्ट्या कोणतीच कामे करता येणार नाहीत असे ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गोरडे यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोली