लसीकरण मोहीम जोरात ; जिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:37 AM2021-02-25T04:37:14+5:302021-02-25T04:37:14+5:30

जिल्हा रुग्णालय : सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस दाेन आकड्यांनी ...

Vaccination campaign loud; Huge crowd at the district hospital center | लसीकरण मोहीम जोरात ; जिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर प्रचंड गर्दी

लसीकरण मोहीम जोरात ; जिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर प्रचंड गर्दी

Next

जिल्हा रुग्णालय : सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस दाेन आकड्यांनी वाढ होत असताना, जिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्रावर आलेल्या कर्मचाऱ्यांकडून मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र बुधवारी सकाळच्या सुमारास पाहायला मिळाले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ९ केंद्रांवर कोरोना लसीकरण केले जाते. एक-दोन केंद्र वगळता बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून येते. २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रांगेत उभे राहणे तर सोडाच काहींनी मास्कही घातलेले नव्हते. २३ फेब्रुवारी रोजी ३८ रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, असे असताना कोणालाही काहीच कसे वाटत नाही? हा प्रश्न आहे. जिल्ह्यात परिचारिका वसतिगृह, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी, ग्रामीण रुग्णालय औंढा, उपजिल्हा रुग्णालय, वसमत, ग्रामीण रुग्णालय, सेनगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, हट्टा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरडशहापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाकोडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आखाडा बाळापूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, डोंगरकडा आदी ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र आहेत. जिल्ह्यातील ९ केंद्रांवर २३ फेब्रुवारी रोजी २२७ कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले. लसीकरणाचा दुसरा डोस १७९ जणांनी घेतला असून, ६ हजार १८८ लसीकरण झालेल्यांची संख्या आहे. २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर नगर परिषद, महसूल, एसआरपीसह विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी नावनोंदणी करुन लसीकरण करुन घेतले.

२२७ जणांचे लसीकरण

२३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर २२७ कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घेतले. हा लसीकरणाचा दुसरा टप्पा असून, सर्वजण उत्साहाने लसीकरण करताना दिसून येत आहेत. परंतु, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचेही पाहायला मिळत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण अधिक असल्याने सर्वांनी सध्यातरी काळजी घेणे आवश्यक आहे.

लस घेतल्यानंतर...

लसीकरण केल्यानंतर सुरुवातीला थोडा त्रास होतो, नंतर मात्र काहीच वाटत नाही. तापाचे इंजेक्शन घेतल्यानंतर जशी वेदना होते, त्याप्रमाणे थोडी वेदना होते. थोड्या प्रमाणात अशक्तपणा वाटू लागतो. काहीवेळाने मात्र लसीकरण केलेल्या जागी दुखत नाही. सर्वांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया लसीकरण झालेल्या रुग्णांनी दिली.

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांना तशा सूचनाही दिल्या आहेत. जे कोणी सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सर्वांनी याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. दंडात्मक कारवाईची वेळ आणू नये. - डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली.

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे आणि लसीकरण (२३ फेब्रुवारी)

जिल्हा सामान्य रुग्णालय १९०

उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी ००

ग्रामीण रुग्णालय, औंढा ०९

उपजिल्हा रुग्णालय, वसमत ००

ग्रामीण रुग्णालय, सेनगाव २४

प्रा. आ. केंद्र, गोरेगाव ००

प्रा. आ. केंद्र, हट्टा ००

प्रा. आ. केंद्र, शिरडशहापूर ००

प्रा. आ. केंद्र, वाकोडी ००

प्रा. आ. केंद्र, आखाडा बाळापूर ०१

प्रा. आ. केंद्र, डोंगरकडा ०३

फोटो न. ०३

Web Title: Vaccination campaign loud; Huge crowd at the district hospital center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.