शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

१३ लघुतलाव १00 टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:16 IST

जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या चांगल्या पर्जन्यामुळे २६ पैकी १३ लघुतलाव पूर्णपणे भरले आहेत. उर्वरितपैकी ८ तलाव ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तर ३ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या चांगल्या पर्जन्यामुळे २६ पैकी १३ लघुतलाव पूर्णपणे भरले आहेत. उर्वरितपैकी ८ तलाव ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तर ३ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले आहेत.हिंगोली जिल्ह्यात आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व काही भागात तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगले पर्जन्यमान झाले. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरीही जलसाठे वाढण्यास मदत झाली. काही ठिकाणचे तलाव या पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील ३ तलाव मात्र अजूनही ५0 टक्क्यांच्या आतच राहिल्याचे चित्र आहे. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतही चिंचखेडा, खोलगाडगा, राहाटी येथे १00 टक्के जलसंचय झाला. केवळ खेर्डा कोल्हापुरी बंधाºयातच ३१ टक्के पाणी साठले आहे.हिंगोली जिल्ह्यातील लघुतलावांमध्ये एकूण ५१ दलघमी जलसाठा झाला आहे. यापैकी ४६ दलघमी उपयुक्त साठा आहे. हिंगोली तालुक्यातील पारोळा १00 टक्के, वडद-९९ टक्के, थोरजवळा १00 टक्के, हिरडी ८५ टक्के, सवड १00 टक्के, पेडगाव-४९ टक्के तर हातगाव तलावात ९६ टक्के जलसाठा झाला आहे. सेनगाव तालुक्यातील सवना ९६ टक्के, पिंपरी ९८ टक्के, घोडदरी १00 टक्के, औंढा नागनाथ तालुक्यातील मरसूळ ३0 टक्के, वाळकी १00 टक्के, सुरेगाव ४0 टक्के, औंढा १00 टक्के, सेंदूरसना १00 टक्के, पुरजळ ८५, वंजारवाडी ६५, पिंपळदरी १00, काकडदाभा-१00, केळी ७५ टक्के भरला आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, देवधरी व बोथी हे तलाव १00 टक्के भरले आहेत. दांडेगाव ९५ टक्के भरला आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावही १00 टक्के भरला आहे. यावर्षी उन्हाळी पिकांपर्यंतही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होण्याची शक्यता आहे.इसापूर ७८ टक्के, सिद्धेश्वर ९१ टक्क्यांवरकळमनुरी : इसापूर धरण परिसरात परतीचा पाऊस चांगलाच बरसल्याने इसापूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. सध्या इसापूर धरणात ७८.५५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ४३८.७१ मीटर असून, उपयुक्त जलसाठा ७५७.३३ दलघमी एवढा आहे.येलदरी धरणात आता ९८ टक्के जलसाठा आहे. या धरणातील एकूण जलसंचय ९१८ दलघमी असून ७९४ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. या धरणातून विद्युतनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून सिद्धेश्वरमध्येही पाण्याचा विसर्ग झाला.सिद्धेश्वरमध्ये इतर मार्गांनीही येणाºया पाण्यामुळे ९१ टक्के जलसाठा झाला असून जिवंतसाठा ७४ दलघमी तर एकूण २४४ दलघमी पाणी आहे. यामुळे यंदा जिल्ह्यालगतच्या सर्वच धरणांत दरवर्षीपेक्षा कित्येक पटीने चांगला जलसाठा झाला आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण