शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आईच्या मृत्यूचे वृत्त समजताच मुलीनेही सोडले आपले प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 20:04 IST

आई, मुलीवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार

ठळक मुद्देहिंगोली जिल्ह्यातील घटना हृदविकाराच्या झटकेने निधन

गिरगाव (जि. हिंगोली) : जन्म देणाऱ्या आईच्या मृत्यूची वार्ता कळताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्रिवेणाबाई लक्ष्मणराव नरडेले (५५) या मुलीनेही प्राण सोडले. ही घटना वसमत तालुक्यातील खाजमापूरवाडी येथे ५ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. 

वसमत तालुक्यातील खाजमापूर वाडी येथील त्रिवेणाबाई नरडेले यांचे माहेर वसमत तालुक्यातीलच बारेपुरवाडी येथील आहे. त्यांच्या आई शिवकाशी गणपतराव दत्तगोंडे (८५) या अर्धांगवायूच्या आजाराने मागील दोन महिन्यांपासून त्रस्त होत्या. त्याच आजारात त्यांचे ५ आॅगस्ट रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास निधन झाले. दरम्यान, शिवकाशी यांच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी खाजमापूर वाडी येथील त्यांची मुलगी त्रिवेणाबाई नरडेले यांच्या मुलाला नातेवाईकांनी फोन केला. ही वार्ता मुलाने घरात सांगताच त्रिवेणाबाई नरडेले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचेही निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

आई, मुलीवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार५ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान शिवकाशी दत्तगोंडे यांच्यावर बारेपूरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते आटोपून नातेवाईकांनी तात्काळ खाजमापूरवाडी गाठली. दुपारी ४ वाजता शिवकाशी यांची मुलगी त्रिवेणाबाई नरडेले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवकाशी यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली व नातवंडे, असा परिवार आहे, तर त्रिवेणाबाई नरवाडे यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली व नातवंडे, असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोली