शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी

By विजय पाटील | Updated: October 20, 2023 16:54 IST

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा (शिंदे) व पार्डी (खुर्द) ग्रामपंचायतींनी घेतला ठराव

हिंगोली: गत ७० वर्षापासून मराठा समाजाला प्रत्येक सरकार आरक्षणाचे गाजर दाखवत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्यांच्या मागणीला पाठिंबा देत वसमत तालुक्यातील पार्डी (खुर्द) व पांगरा (शिंदे) येथील ग्रामपंचायतींनी एकमुखी ठराव घेऊन गावात कोणत्याही पुढाऱ्यांना (मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक) प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

१९ ऑक्टोबर रोजी पार्डी खुर्द येथील मारोती मंदिरासमोरील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच गोविंद रामराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. जोपर्यंत मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत कोणत्याही पुढाऱ्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, तसेच प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे, असा एकमुखी ठराव घेतला.

‘एक मराठा लाख मराठा’ ची दिली घोषणा...पार्डी खुर्द व पांगरा शिंदे येथील ग्रामपंचायतीने बैठक घेऊन नुसता इशाराच दिला नाही तर हा ठराव कृतीत उतरविला आहे. गावातील सकल मराठा समाजाची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते राजकीय व्यक्तीला गावात येण्यास मज्जाव केला आहे. सर्व मराठा समाजाने या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आमदार, खासदार, मंत्री यांना मंडळीना पार्डी व पांगरा येथे पाऊल टाकता येणार नाहीत. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ ची घोषणा देण्यात आली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोली