शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

जिल्ह्यातील ११७८ क्षयरूग्ण उपचाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:53 IST

दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील ११७८ क्षयरूग्ण उपचाराखाली आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून १ एप्रिल २०१८ पासून जिल्ह्यातील क्षयरूग्णांच्या थेट बँक खात्यावर आॅनलाईनद्वारे उपचार सुरू राहिपर्यंत दरमहा ५०० रूपये ‘निक्षय पोषण योजने’अंतर्गत जमा केले जात आहेत.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील ११७८ क्षयरूग्ण उपचाराखाली आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून १ एप्रिल २०१८ पासून जिल्ह्यातील क्षयरूग्णांच्या थेट बँक खात्यावर आॅनलाईनद्वारे उपचार सुरू राहिपर्यंत दरमहा ५०० रूपये ‘निक्षय पोषण योजने’अंतर्गत जमा केले जात आहेत.क्षयरोग हा गंभीर आजार. मात्र औषधोपचाराने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. क्षयरूग्णांवर जिल्हा रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपचार केले जातात. रूग्णांना लागणारी सर्व औषधीही मोफत आहे.२0२५ सालापर्यंत देशातून टी.बी. हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे.जिल्हा क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम विभागातर्फे जिल्हाभरात मोहीम राबवून क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. २०१८ या वर्षात जिल्ह्यातील १०२० तर चालू वर्षातील दोन महिन्यातील १५८ एकूण ११७८ क्षयरूग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ५ टीबी युनिट कार्यरत असून २९ आरोग्य संस्थांमार्फत कार्यक्रम राबविला जात आहे. क्षयरोग निदानासाठी १५ थुंकी तपासणी केंद्र कार्यरत आहेत. शासकीय आरोग्य संस्था, खासगी-व्यावसायिक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत रूग्णांना औषधोपचार दिला जात आहे. क्षयरोगाच्या अचूक व त्वरित निदानासाठी जिल्हा रूग्णालयाच्या क्षयरोग विभागाकडे सीबीनेट यंत्रणाही उपलब्ध आहे. ताप, भूक मंदावणे, छातीत दुखणे अशी लक्षणे दिसल्यास क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी. क्षयरोगाचे जंतू मुख्यत: हवेतून पसरतात. फुफ्फुसाचा क्षयरोग झालेला रूग्ण ज्यावेळी खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ते जंतू शरीरात प्रवेश करतात. जंतू सूक्ष्म थेंबांद्वारे हवेत पसरतात. निरोगी व्यक्ती जेव्हा श्वास घेतो, तेव्हा जंतू शरीरात प्रवेश करतात व क्षयरोग होऊन जंतूसंसर्ग होतो. मात्र संसर्ग झालेल्या सर्वच व्यक्तींना क्षयरोग होत नाही. त्या व्यक्तीच्या शरीरात हे जंतू वर्षानुवर्षे सुप्त अवस्थेत असतात.क्षयरोग रूग्णांनी डॉक्टरांनी दिलेला डोस पूर्ण घ्यावा४क्षयरोगींनी डॉक्टरांकडून दिला जाणारा डोस पूर्णपणे घेतल्यास टीबी हा रोग बरा होतो. परंतु अनेक रूग्ण औषधोपचार सुरू असताना मध्येच डोस बंद करतात. त्यामुळे क्षयरोग पूर्णपणे बरा होत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेला डोस हा रूग्णांनी पूर्णपणे घेणे आवश्यक आहे.४ज्या व्यक्तीला क्षयरोग (टी.बी.) असेल ती व्यक्ती बोलल्यास, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मध्येच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते.पोषक आहारासाठी क्षयरोग रूग्णांना ‘निक्षय पोषण योजनां’चा आधार’ क्षयरोग रूग्णांची रोग प्रतिकार क्षमता कमी होते, त्यामुळे या रूग्णांना औषधोपचाराबरोबरच सकस आहार आहार मिळावा व रूग्ण बरा व्हावा, या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून, सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग असलेल्या रूग्णांसाठी निक्षय पोषण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील अनेक रूग्णांच्या बँक खात्यावर ५०० रूपये या प्रमाणे रक्कम जमा केली जात आहे. टीबीग्रस्त असलेल्या रूग्णांवर जोपर्यंत उपचार सुरू राहतील तोपर्यंत शासनाच्या अनुदानाची रक्कम त्याच्या खात्यावर जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभागातर्फे जमा केली जाणार आहे. उपचार सुरू असताना रूग्णाला पोषण आहार घेता यावा, या उद्देशाने निक्षय पोषण योजनेअंतर्गत रकमेचा लाभ शासनाकडून दिला जात असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच जवळपा ९० टक्के रूग्णांनी बँक खाते उघडली असून उर्वरीत १० टक्के रूग्णांचेही खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गिते यांनी सांगितले. गतवर्षी व चालू वर्षातील मिळून एकूण ११७८ क्षयरूग्णांची संख्या आहे. तर खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या २४६ क्षयरोग रूग्णांनाही योजनेअंतर्गत शासनाकडून दिली जाणारी ५०० रूपये रक्कम दिल्याचे सांख्यिकी सहाय्यक सुनील शिरफुले यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीHealthआरोग्य