शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हिंगोलीत वाळूघाटावर कंत्राटदारांचा अघोषित बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:43 IST

महसूल बुडाला तर चालेल मात्र माफियाराज संपवू असे राणा भीमदेवी थाटात सांगणा-या अधिका-यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुणीच घाट घेत नसल्याने महसूल डुबत आहे. तर दुसरीकडे हिंगोलीत अवैध मार्गाने येणा-या वाळूवर जिल्हा प्रशासन विशेषत: उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर अचानक मेहेरनजर का दाखवत आहेत, हे कळायला मार्ग नाही.

ठळक मुद्दे... त्याचा बैल रिकामाची प्रचिती : अवैध वाहतूक करणाºयांची चांदी; हिंगोली, कळमनुरीत सर्वाधिक उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महसूल बुडाला तर चालेल मात्र माफियाराज संपवू असे राणा भीमदेवी थाटात सांगणा-या अधिका-यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुणीच घाट घेत नसल्याने महसूल डुबत आहे. तर दुसरीकडे हिंगोलीत अवैध मार्गाने येणा-या वाळूवर जिल्हा प्रशासन विशेषत: उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर अचानक मेहेरनजर का दाखवत आहेत, हे कळायला मार्ग नाही.अधिकाºयांनी यंदा हिंगोली जिल्ह्यातील वाळूघाट लिलावासाठी केवळ औपचारिकता पूर्ण केली. गतवर्षी कंत्राटदारांना पावत्या असतानाही वाहने पोलीस ठाण्यात सडवत ठेवण्याची वेळ आली होती. त्यातच त्यांचे कोणी ऐकूनच घेत नसल्याने मोठी अडचण होती. जी वाहने पावत्यांशिवाय शहरात आली, त्यांना दंड आकारल्यानंतर मात्र कोणतीही खळखळ न करता माफियांनी दंड भरल्याचेही पहायला मिळत होते. मात्र अवैधसोबत वैध मार्गाने वाळू वाहतुकीलाही येणारी अडचण लक्षात घेता कंत्राटदारांनी यंदा लिलाव प्रक्रियेत भागच घेतला नाही. मागच्या वेळी चार घाट लिलावात गेले. कुणीच मुदतीत रक्कम भरली नव्हती. एकाने मदतीनंतर का होईना, भरली त्याला कसबे धावंडा येथून वाळू उत्खननाची परवानगीही मिळाली. इतर तीन घाटांना मात्र मुदतीनंतर रक्कम भरण्याची तयारी दाखविल्यानंतरही प्रशासनाने नकार दिला. त्यानंतर पुन्हा १९ घाटांची प्रक्रिया केली. आता त्यालाही कोणी बोलीत सहभागी झाले नाही. सर्वांच्या फायनान्सियल बिडसंदर्भात काही शासन निर्णय आहे काय, याचा शोध घेतला जात आहे. मात्र यातून काही फारसे हाती लागेल, अशी सुतराम शक्यता दिसत नाही. तसे झाल्यास आधीच थांबलेली बांधकामे पूर्ण करण्यासाठी अवैध वाहतुकीच्या वाळू शिवाय पर्यायच दिसत नाही. परंतु ही वाळू दर्जाहीन असल्याने काँक्रिटीकरणाच्या कामासाठी तिचा उपयोग करणे अवघड आहे. काहीजण मात्र डस्टसह ही वाळू वापरून काम भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा नवा पर्यायच आगामी काळात सोयीस्कर ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.महसूल प्रशासनाने कंत्राटदारांचे नाक दाबून तोंड उघडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे आता ़‘..... त्याचा बैल रिकामा’ असा ठरू लागला आहे. तरीही प्रशासनाने बोध घेतला नाही.