शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत आगीत दोन दुकाने खाक; अडीच ते तीन कोटींच्या नुकसानाचा अंदाज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:24 IST

शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

हिंगोली : शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुकानातील साहित्य पूर्णपणे खाक झाले असून इमारतही क्षतीग्रस्त झाली आहे.

गांधी चौक भागात प्रदीप पद्माकर दोडल यांचे खुप जुने प्रतिष्ठान असलेल्या कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. रात्र असल्याने ही आग वेळीच लक्षात आली नाही. ती निदर्शनास येईपर्यंत आतमध्ये सर्व कापडच असल्याने तिचा चांगलाच भडका उडाला होता. बघ्यांची गर्दी जमली असतानाही आगीच्या लोळापुढे कुणाचेच काही चालत नव्हते. तरीही काहींनी हिंमत करून शटरला दोरी बांधून ती दुरून ओढली. यात एक-दोन जण जखमी झाले. शिवाय हिंगोलीच्या अग्नीशामक दलाचा बंबही आला. त्याचबरोबर कळमनुरीचा बंबही बोलावण्यात आला होता. खाजगी टँकरही लावले होते. 

स्थानिक नागरिक, अग्नीशामक दलाचे कर्मचारी अशा सर्वांनीच आग विझविण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली. मात्र तरीही जवळपास साहित्य, रेडिमेड कापडाचे दालन, लग्नबस्ता, साड्या, शुटींग, शर्टिंग अशा तिन्ही मजल्यांवरील माल जळून खाक झाला. आग आटोक्यात येईपर्यंत मोठे नुकसान झाले होते. तर आजूबाजूच्या दुकानांनाही आगीने घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र एका दुकानातील थोडेबहुत नुकसान झाले आहे. ते नेमके किती? याचा अंदाज नाही. आगीची तीव्रता एवढी जास्त होती की, काचा वितळल्या, लोखंडी गजाळ्याही वाकल्या. घटनास्थळी आ.तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, पोनि अशोक मैराळ यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचा-यांनी पाहणी केली.  तर अग्निशमन दलाच्या पथकासह पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाजूच्या दुकानातील साहित्य काढण्यास मदत केली. त्याही दुकानाचे काही प्रमाणात नुकसान झाले. 

अनर्थ टळलारात्री दोनच्या सुमारास व्यापारपेठेतील अनेकांनी आग विझविण्यासाठी तसेच ती इतरत्र भडकणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मदत केली. अन्यथा मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात ही आग लागली होती. शिवाय या भागात कापड दुकानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर ती इतर दुकानांमध्ये पसरण्याची भीती होती. तर दुकानाजवळ असलेल्या रेणुकादास दोडल यांच्याही दुकानाला आस लागल्याने त्याच्या काचा फुटल्या. दुकानातील साहित्याचे नुकसान झाले नसले तरी समोरून मात्र पूर्ण दुकान जळून खाक झाले. 

ज्यूस सेंटरलाही आगअष्टविनायक चौक परिसरातील सागर ज्यूस सेंटरमध्येही शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात ज्यूस तयार करण्याच्या मशिन, फ्रीजर, फर्निचर, शीतपेयांच्या कॅरेटचे आगीमुळे नुकसान झाले आहे. एकाच दिवशी दोन घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :fireआगHingoli policeहिंगोली पोलीस