शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

फिल्टरमुळे माठ व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:45 IST

ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक बाटलीबंद किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावागावात पारंपरिक माठ विक्रीच्या व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक बाटलीबंद किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावागावात पारंपरिक माठ विक्रीच्या व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे.कमी पैशात सहजगत्या शुद्ध पाणी मिळते शिवाय ते थंड करण्यासाठी घरातील फ्रीजचा मार्ग मोकळा असल्याने आजघडीला गरिबांचा फ्रीज समजला जाणाऱ्या माठाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसून येते. शहरातील कुंभार गल्लीत पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जातात. हे माठ बाजारात विक्रीसाठी आणले जातात. मात्र मागील काही वर्षापासून माठाच्या मागणीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाला केवळ पाच ते दहा माठांची विक्री होते. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सवलतीच्या दरात फ्रीज तसेच संबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचा कल या आधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे पाण्याच्या जारला मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे औढा शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी आरओ प्लांट सुरू झाले आहे. काळानुसार या व्यवसायालाही चार चांद लागल्याचे दिसून येत आहे. सुमारे १० ते १५ ठिकाणी पाणी शुद्ध करून ते जारमध्ये भरून मिळते. वीस लिटर शुद्ध पाणी अवघ्या दहा ते वीस रुपयांना घरपोच मिळते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात माठाएवजी जारच दिसून येत आहेत. याशिवाय घरोघरी शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसवलेले आहेत. पूर्वी दीडशे रुपयांना मिळणारा माठ नागरिक दोन वर्षे वापरत होते. मात्र सध्या रोज जारच्या पाण्यासाठी जास्त खर्च करण्याची तयारी नागरिकांची असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम माठ विक्री व्यवसायावर झाला आहे. माठाला मागणी कमी होत असून व्यवसायावर मंदीचे सावट दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषण