हळदीचे दर घसरले; आवक मात्र वाढतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:29 AM2021-04-17T04:29:12+5:302021-04-17T04:29:12+5:30

हिंगोली: सध्या सोयाबीन, हरभऱ्याचे वाढलेले भाव स्थिर असले, तरीही हळदीच्या दरात मात्र मागच्या आठवड्यापेक्षा तब्बल सातशे रुपयांनी घट झाली ...

Turmeric prices fell; However, the income is increasing | हळदीचे दर घसरले; आवक मात्र वाढतीच

हळदीचे दर घसरले; आवक मात्र वाढतीच

Next

हिंगोली: सध्या सोयाबीन, हरभऱ्याचे वाढलेले भाव स्थिर असले, तरीही हळदीच्या दरात मात्र मागच्या आठवड्यापेक्षा तब्बल सातशे रुपयांनी घट झाली आहे, तरीही बाजारपेठेत हळदीची आवक वाढलेलीच आहे. शुक्रवारी साडेचार हजार पोत्यांची आवक झाली होती.

हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, तर इतर जिल्ह्यांतील हळद येथे विक्रीला येते. यंदा मागच्या आठवड्यात हळदीचे दर साडेआठ हजारांच्या आसपास गेले होते. अनेकांना ८ हजार २५० रुपयांचा दर मिळाला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी दर घसरून ते ८ हजारांवर आले होते. आता पुन्हा त्यात आज घट झाल्याचे दिसून येत आहे. आज साडेसात हजार ते सात हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंतचा दर मिळाला. त्यामुळे हिंगोलीत हळदीची आवक घटण्याची भीती होती. मात्र, सध्या संचारबंदी असतानाही येथे हळदीची आवक मागच्या वेळीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. आज साडेचार हजार पोत्यांची आवक झाली आहे. त्यामुळे आज पुन्हा वाहनांच्या रांगा मोंढ्यासमोर लागल्याचे दिसून येत होते. त्यात वाहनांना टोकन देऊन वाहने आत सोडली जात होती. संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड परिसरात यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे जुना मोंढा भागातही हरभरा, सोयाबीन, तुरीची आवक झाली होती. आज हरभऱ्याची जवळपास हजार पोत्यांची आवक झाली आहे. हरभऱ्याला ५,३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर साेयाबीनची जवळपास ५०० पोत्यांची आवक होती. सोयाबीन ६,८०० ते ६,९०० रुपयांपर्यंत विकले गेले.

बुधवारपर्यंत मोंढा राहणार बंद

हिंगोलीतील मोेंढ्यातील एक व्यापारी बाधित आढळल्यानंतर खबरदारी म्हणून मोंढा पुढच्या बुधवारपर्यंत बंद राहणार आहे. तसेही रामनवमी व रविवारमुळे दोन दिवस वाया जाणार होते. सोमवारी होणारे बीट यामुळे होणार नाही. पुढच्या गुरुवारीच आता मोंढा सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाच दिवस मोंढ्यात माल आणता येणार नाही.

Web Title: Turmeric prices fell; However, the income is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.