शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा

By रमेश वाबळे | Updated: January 23, 2024 19:40 IST

भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे.

हिंगोली : येथील मोंढ्यात १० हजार ३०० रूपयांचा पल्ला गाठलेल्या तुरीच्या दरात मंगळवारी पाचशे रूपयांनी घसरण झाली. तर सोयाबीनही सध्या पडत्या भावातच विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

यंदा सोयाबीनसह तूर, कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. अत्यल्प पाऊस, पिके ऐन भरात असताना किडीचा प्रादुर्भाव यामुळे फटका बसला. उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात तरी समाधानकारक भाव मिळेल अशी आशा होती. मात्र, लागवड आणि उत्पादनाचा विचार केल्यास यंदा सोयाबीन कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. डिसेंबरमध्ये दोन- तीन दिवस सोयाबीनने पाच हजारांचा पल्ला गाठला. परंतु, त्यानंतर तीनशे ते चारशेंनी भाव घसरले. पुन्हा भाव वाढतील अशी आशा होती. मात्र, निराशा होत आहे. सध्या सरासरी ४ हजार ५०० रूपयांवर भाव जात नसल्याचे चित्र आहे.

तुरीला मात्र समाधानकारक भाव मिळत आहे. २० जानेवारी रोजी तुरीला किमान ९ हजार ६५० ते १० हजार ३०० रूपये भाव मिळाला होता. परंतु, उत्पादनात घट झाल्यामुळे या भाववाढीचा फारसा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच मंगळवारी क्विंटलमागे जवळपास पाचशे रूपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजी पुढे येत होती.

दोन दिवसांच्या बंदमुळे आवक वाढली...रविवारी हक्काची सुट्टी आणि सोमवारी अयोध्येतील सोहळ्यानिमित्त बाजार समिती प्रशासनाने मोंढा, मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे मंगळवारी सोयाबीनसह तुरीची आवक वाढली होती. सोयाबीन ८०० क्विंटल तर तुरीची आवक ३०० क्विंटल झाली होती. परंतु, भावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

सोयाबीन दराची कोंडी कायम...भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असून, भाव वाढीची अपेक्षा आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता कमी असून, मागील तीन महिन्यांपासून दरवाढीची कोंडी कायम असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली