हिंगोली, दि. 7 - तालुक्यातील बासंबा फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७. ३० च्या सुमारास घडली. राजाराम ग्यानबा आढाव (३७ रा. ब्राम्हणवाडा ता. वाशिम) असे मयताचे नाव आहे. ते ज्ञानेश्वर अशोक येवले यांनी घेतलेल्या बुलेटची परभणी येथून सर्विसिंग करुन गावाकडे परत जात होते.दरम्यान, बासंबा फाट्याजवळील दंत महाविद्यालयाजवळ हिंगोलीमार्गे येणाºया भरधाव ट्रकने आढाव यांच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. यात आढाव जागीच ठार झाले. तर ज्ञानेश्वर येवले गंभीर जखमी झाले होते. येथे वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी पोनि जगदिश भंडरवार, एएसआय पोटे, शेषराव पोले, शेख जावेद, नंदकुमार मस्के, रणखांब, सतीष जाधव, ठाकूर हे दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. आंदोलनाचा इशाराहा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळेच अपाातही वाढले आहेत. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत
बासंबा फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 23:02 IST