शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर लोखंडी अँगल शरीरात घुसल्याने ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 15:33 IST

ट्रकमधील लोखंडी अँगल पुढे घसरत येत समोरच्या कॅबीनला फोडून ड्रायव्हर आणि क्लीनरच्या शरीरात घुसले.

ठळक मुद्दे आखाडा बाळापूर नजिक दाती शिवारात घडला अपघात ड्रायव्हर आणि क्लीनर दोघेही इंदोर येथील रहिवासी होते

आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : चालकाचा ताबा सुटल्याने मालवाहू ट्रक रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यामध्ये घुसला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी अँगल पुढे घसरत येत समोरच्या कॅबीनला फोडून ड्रायव्हर आणि क्लीनरच्या शरीरात घुसले. यात दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान नांदेड - हिंगोली रोडवरील दाती शिवारात घडली.

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहीम रोडवेज ट्रान्सपोर्ट कंपनीचा एक मालवाहू ट्रक ( एम .पी.9- एच. एफ. 7344 )  हैदराबाद येथून लोखंडी अँगल घेऊन  इंदोरकडे जात होता. सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्यादरम्यान दाती शिवारातून जाताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात गेला. यामुळे ट्रकमधील लोखंडी अँगल वेगाने पुढे घसरले आणि ट्रकची कॅबीन फोडून बाहेर आले. हे अँगल ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्या शरीरात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळताच बाळापुर पोलीस ठाण्याचे सपोनि रवी हुंडेकर, बीट जमादार शेख  बाबर, भगवान वडकिल्ले, संजय मार्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अँगलखाली दबलेल्या ड्रायव्हर व क्लीनरला बाहेर काढले. मात्र त्यांच्या मृत्यू झाला होता. संजय मधुकर नेवले (वय 64 वर्षे राहणार बमोरी मोहल्ला इंदोर मध्यप्रदेश ) असे ड्रायव्हरचे तर सोनू शंकर राव (वय 35 वर्ष ,राहणार बमोरी मोहल्ला इंदोर )असे क्लीनरचे नाव असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिली. 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातHingoliहिंगोली