शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-सिगारेट,१ कोटींचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:12 IST

हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डी मोडजवळ उत्तरप्रदेशचे दोन ट्रकमधून सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. सिगार व ट्रक असा मिळुन जवळपास १ कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डी मोडजवळ उत्तरप्रदेशचे दोन ट्रकमधून सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. सिगार व ट्रक असा मिळुन जवळपास १ कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.‘आरोग्यास धोकादायक’ असा मजकूर सिगारेटच्या पाकीटावर नव्हता. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. सविस्तर माहिती अशी की सिगारेट दोन ट्रकमध्ये जात असल्याची गुप्त माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली ही माहिती मिळताच फौजदार सुभान केंद्रे, गणेश राठोड, संभाजी लेकुळे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, बालाजी बोके, प्रल्हाद थोरात यांनी यांनी नांदेडकडे जाणाऱ्या एच.आर- ५५ के. ९३९६ व एचआर - ५५ एम २७०३ हे ट्रक पकडून पोलीस ठाण्यात आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर एचआर ५५ के ९३९६ या ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये पॅरीस नावाचे सिगारेट आढळून आले. हे सिगारेट ५८ लाखाचे असल्याचे आढळून आले. या सिगारेटवर आरोग्यासाठी धोकादायक असे लिहिलेले नसल्यामुळे ते अवैध असल्याने हे सिगारेट जप्त करण्यात आली. दुसरा ट्रक एचआर ५५ एम २७०३ ११ जानेवारी तपासल्या जाणार असल्याचे फौजदार केंद्रे यांनी सांगितले. या दोन्ही ट्रकची तपासणी केल्यानंतर ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी