शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पणन कायद्यातील दुरूस्ती विरोधात हिंगोली जिल्ह्यातील सहा बाजार समित्यातील व्यवहार बंद

By रमेश वाबळे | Updated: February 26, 2024 17:49 IST

सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले जात आहे.

हिंगोली : राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार पणन कायद्यात बदल करण्यात येत आहे. याला मात्र बाजार समित्यांनी विरोध दर्शवित २६ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बंद पुकारला. यामुळे जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले. परिणामी, कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली.

सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले जात आहे. हे विधेयक म्हणजे राज्यातील ज्या बाजार समित्यांमध्ये इतर राज्यातून ३० टक्क्यांहून अधिक माल येत असल्यास अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला जाणार आहे. त्याच बरोबर या बाजार समित्यांवर शासन नियुक्त मंडळ कार्यरत असणार आहे. यात बहुतांश बाजार समित्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. जर असे झाले तर बाजार समितीवर अवलंबून असलेले शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी या घटकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारकडून होत असलेल्या पणन कायद्यातील दुरूस्तीला विरोध दर्शविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह वसमत, जवळा बाजार, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि त्यातंर्गत उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 

हळद मार्केट यार्ड, मोंढ्यात शुकशुकाट...मराठवाड्यासह सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात बंदमुळे २६ फेब्रुवारी रोजी शुकशुकाट होता. तसेच मोंढ्याही अशीच परिस्थिती पहायला मिळाली. हा परिसर नेहमी शेतकरी, हमाल, मापारी, व्यापाऱ्यांच्या गर्दीने गजबजलेला असतो. सोमवारीच्या बंदमुळे मात्र सर्वत्र शुकशुकाट होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarketबाजारagitationआंदोलन